रेल्वेस्थानकावर जोडीने फिरतोय 'तो'..जरा जपून!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

रात्रपाळीत काम करणारे रेल्वे कामगार धास्तावले आहेत. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. वीस बंगला, सहा बंगला, पोर्टळ चाळ, आठ चाळ, मिलिंदनगर, सह्याद्रीनगर, पंढरपूरवाडी, गावठा या ठिकाणाचा रहदारीचा रस्ता असून, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला मार्गक्रमण करतात. अनेक रेल्वे बंगले या भागात आहेत.  यामुळे सापळा रचून रेल्वे कार्यालयाच्या बाजूला वन विभागाने पिंजरा लावला. त्यात बोकड ठेवला तरीही दोन दिवसांपासून तिकडे बिबट्या फिरकलाच नाही. गुरुवारी (ता. 23) रात्री दोनच्या सुमारास रेल्वे कर्मचारी व रेल्वे प्रवाशांना बिबट्या दिसला. 

नाशिक : (इगतपुरी) येथील रेल्वेस्थानक व आयओडब्ल्यू रेल्वे कार्यालय परिसरात दोन दिवासांपासून बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने नागरिकांसह रेल्वे प्रवासी भयभीत झाले आहेत. रात्रपाळीत काम करणारे रेल्वे कामगार धास्तावले आहेत. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. वीस बंगला, सहा बंगला, पोर्टळ चाळ, आठ चाळ, मिलिंदनगर, सह्याद्रीनगर, पंढरपूरवाडी, गावठा या ठिकाणाचा रहदारीचा रस्ता असून, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला मार्गक्रमण करतात. अनेक रेल्वे बंगले या भागात आहेत. 

नागरिकांना बिबट्या दिसल्याने शहरात भीतीचे वातावरण 

नागरी वस्तीत बिबट्याचे अनेकांना दर्शन झाले आहे. या घटनेची दखल वन विभागाने घेत परिसरात पाहणी केली असता, रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर आयओडब्ल्यू रेल्वे कार्यालयाच्या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे दिसून आले. यामुळे सापळा रचून रेल्वे कार्यालयाच्या बाजूला वन विभागाने पिंजरा लावला. त्यात बोकड ठेवला तरीही दोन दिवसांपासून तिकडे बिबट्या फिरकलाच नाही. गुरुवारी (ता. 23) रात्री दोनच्या सुमारास रेल्वे कर्मचारी व रेल्वे प्रवाशांना बिबट्या दिसला. 

संचार करणारे बिबटे नर आणि मादीचा शोध सुरु

पहाटे साडेचारच्या सुमारास बसस्थानक व बस आगार भागात नागरिकांना बिबट्या दिसल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात संचार करणारे बिबटे नर आणि मादी असून, त्यांचे बछडे कुठेतरी असल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. वनकर्मचाऱ्यांनाही अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले. 

हेही वाचा>इगतपुरीच्या हातसडीच्या तांदळाची मुंबईत चलती!

सह्याद्रीनगर, पंढरपूरवाडी, गावठा, मिलिंदनगर, शिवाजीनगर भागातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रेल्वेच्या मालकीच्या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, दोन दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. 
-विनायक साबळे, रहिवासी 
----- 
रेल्वे प्रशासनाने त्यांच्या मालकीच्या इमारती व घरे तोडल्याने हा परिसर ओसाड झाला आहे. त्यामुळे बिबट्या या भागात आश्रय घेत असून, रात्रीचा प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. -संतोष गांगुर्डे, रहिवासी  

हेही वाचा>इथे होतोय रस्ता डांबरीकरणात भ्रष्टाचार...नगरसेवकांचा आरोप..  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard in Igatpuri Railway Station nashik marathi news