इथे होतोय रस्ता डांबरीकरणात भ्रष्टाचार...नगरसेवकांचा आरोप..  

डांबरीकरण.jpg
डांबरीकरण.jpg

नाशिक : (सिडको) अंबड औद्योगिक वसाहतीत साडेअकरा कोटींच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप नगरसेवक राकेश दोंदे यांनी केला असून, या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांना खड्डे पडले होते. 
स्मार्टसिटीअंतर्गत औद्योगिक वसाहतीचे रस्ते सुधारण्यासाठी महापालिकेने साडेअकरा कोटींचा निधी मंजूर केला. 

चुकीच्या पद्धतीने खडीकरणाचे कामे सुरू

प्रशासनातर्फे रस्त्यांचे 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, सोमवारी (ता. 20) हॉटेल शालिनीसमोर रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने खडीकरणाचे काम सुरू होते. याप्रश्‍नी नगरसेवक राकेश दोंदे यांनी संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता, रस्त्यावर सुरवातीला डांबर टाकले. त्यावरून खडी टाकली जाणार व त्यावर पुन्हा एकदा डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगरसेवक दोंदे यांनी स्वत: काम तपासून बघितले असता, या ठिकाणी त्यांना तथ्य आढळले नाही. 
यावरून त्यांनी कारवाई करत काम थांबविण्याचे आदेश दिले. 

साडेअकरा कोटींचे रस्ते नेमके कुठे?

अंबड औद्योगिक वसाहतीत डांबरीकरण कामात भ्रष्टाचार असावा का? याप्रश्‍नी लवकरच महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन अंबड औद्योगिक वसाहतीतील संपूर्ण साडेअकरा कोटींचे रस्ते नेमके कुठे झाले, याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 


चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे 

अंबड औद्योगिक वसाहतीत साडेअकरा कोटींचा निधी खर्च करून डांबरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामासंदर्भात उद्योजक व कामगारांच्या असंख्य तक्रारी माझ्याकडे आल्या. एका ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, त्यात तथ्य आढळले. या कामात भ्रष्टाचार झाला असून, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. - राकेश दोंदे, नगरसेवक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com