
नाशिक : कोटंबी (ता. पेठ) सकाळची वेळ...शेतात गेल्यावर जरावेळातच अचानक बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. घाबरुन ते इकडे तिकडे पळू लागले. मात्र नंतर लक्षात आले हा आवाज तर विहिरीतून येतोय. डोकावून बघितले तर समोर...
असा आहे प्रकार
शनिवारी (ता. ३१) सकाळी १० वाजे सुमारास कोटंबी येथील शेतकरी पांडूरंग भुसारे हे आपल्या मालकीच्या शेतात गेले. त्यांना विहिरीजवळ बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. घाबरुन ते इकडे तिकडे बघू लागले. त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता त्यांना पाण्यात तरंगताना दिसला. पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात निघालेला साधारण १० महिने वयाचा बिबट्या भुसारे यांच्या विहिरीत पडला. विहीरीत पाणी असल्याने कधी पाण्यात तरंगत कधी कपारीचा आसरा घेत बिबट्याच्या गर्जनेने परिसर दणाणून सोडला.
घटनेची खबर वनविभागास समजल्यानंतर वनक्षेत्रपाल श्रीमती मुसळे यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर फिरते पथक (मोबाईल स्कॉड) सहाय्यक वनसंरक्षक आनंद रेड्डी यांच्यासह रेस्क्यू टीम दुपारी २ ला घटनास्थळी पोहचली. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्यास जेरबंद करून बाहेर काढले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास जंगलात सोडण्यात येईल, असे वनक्षेत्रपाल श्रीमती मुसळे यांनी सांगितले. यावेळी वनविभागाचे मोबाईल स्कॉड वनक्षेत्रपाल कवर, एन बी पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.