VIDEO : रात्रीची वेळ..सामसूम..अन् अचानक हॉस्पीटलमध्ये बिबट्या शिरतो तेव्हा ..काय घडले?

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 7 मे 2020

नामको हॉस्पिटल कॅम्पसमध्ये मल्टि स्पेशालिटी, कॅन्सर विभाग, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास-भोजनासाठीचे सेवा सदन आणि परिचारिका महाविद्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. मात्र रात्री सुरक्षेच्या कारणास्तव काचेचे दरवाजे बंद केले जातात. आणि अचानक बिबट्याची एंट्री होते...तेव्हा मात्र असे घडले...

नाशिक : नामको हॉस्पिटल कॅम्पसमध्ये मल्टि स्पेशालिटी, कॅन्सर विभाग, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास-भोजनासाठीचे सेवा सदन आणि परिचारिका महाविद्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. मात्र रात्री सुरक्षेच्या कारणास्तव काचेचे दरवाजे बंद केले जातात. आणि अचानक बिबट्याची एंट्री होते...तेव्हा मात्र असे घडले...

असा घडला प्रकार 

नामको हॉस्पिटल कॅम्पसमध्ये मल्टि स्पेशालिटी, कॅन्सर विभाग, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास-भोजनासाठीचे सेवा सदन आणि परिचारिका महाविद्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. मात्र रात्री सुरक्षेच्या कारणास्तव काचेचे दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. हा बिबट्या नामको हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेमधून भिंतीवरुन उडी मारून आला असावा, असा अंदाज आहे. कारण, हॉस्पिटलचे एक्झिट गेट रात्री बंद केले जाते आणि एण्ट्री गेटवर सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यामुळे एक्झिट गेटच्या बाजूने भिंतीवरुन हा बिबट्या उडी मारून आत आला असावा, असा अंदाज आहे.रुग्णालयापासून काही अंतरावर गंगापूर उजवा तट कालवा, परिसरात शेती, मोकळ्या जागेचे प्रमाण मोठे आहे. यापूर्वीदेखील मखमलाबादसह शहराच्या परिघात नेहमीच बिबट्यांचा वावर आढळून आला आहे. त्यापैकीच हा बिबट्या असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे.

प्रतिबिंब पाहून माघारी फिरला
मुख्य प्रवेशद्वारावर मोठी काच लावलेली असल्याने तिथपर्यंत आलेल्या बिबट्याने काही क्षण थांबून धूम ठोकली. या काचेत बिबट्याने स्वतःचे प्रतिबिंब पाहिले आणि म्हणूनच तो माघारी फिरल्याचेही सांगितले जाते आहे.

सुरक्षेसोबत लाईट्सही वाढवले
रुग्णालय सुरक्षेच्या दृष्टीने दररोज रात्री सर्व प्रवेशद्वार बंद केले जातात. त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही. हा परिसर मोकळा असल्याने वन्यजीवांचा वावर नवीन नाही. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव संस्थेने तातडीने सुरक्षारक्षक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कॅम्पसमधील लाइट्सची संख्याही वाढवली जाते आहे. गस्तीच्या पद्धतींमध्येही बदल करण्यात आला आहे.- शशिकांत पारख, सेक्रेटरी, नामको ट्रस्ट

हेही वाचा > वाह! पोलिसदादा मनचं जिंकलं की हो...वेळप्रसंगी फावडं घेऊन थेट लागले कामाला!

बिबट्या दिसताच भितीने थरकाप..

पेठरोडवरील नामको हॉस्पिटल कॅम्पसमध्ये बुधवारी (दि.६) मध्यरात्री बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली. रुग्णालयाचे दरवाजे बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. पहिल्या मजल्यावर तैनात सुरक्षा रक्षकाने बिबट्या दिसताच अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने वनविभागासह पोलिसांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत बिबट्या फरार झाला होता. 

हेही वाचा > अचानक आगीच्या ज्वाला आकाशात उठल्या...सगळ्यांचाच उडाला थरकाप!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopards spotted on Namco Hospital campus nashik marathi news