esakal | नाशिककरांना दिलासा! जिल्ह्यात ८३ दिवसांनंतर कोरोनाचे चारशेपेक्षा कमी रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates nashik

सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील २३०, नाशिक ग्रामीणचे ८३, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाह्य दोन रुग्‍णांचा समावेश आहे. यापूर्वी गेल्‍या २८ जुलैला दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या अवघी १६९ होती.

नाशिककरांना दिलासा! जिल्ह्यात ८३ दिवसांनंतर कोरोनाचे चारशेपेक्षा कमी रुग्ण

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : ऑक्‍टोबरमधील बहुतांश दिवशी नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपेक्षा कमीच राहिली. सोमवारी (ता. १९) तर अवघे ३१८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तब्‍बल ८३ दिवसांनंतर दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची संख्या चारशेपेक्षा कमी राहिली. दरम्यान, दिवसभरात कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ३१७ होती. तर नऊ रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात सहा हजार ६४८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

चारशेपेक्षा कमी रुग्‍ण

सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील २३०, नाशिक ग्रामीणचे ८३, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाह्य दोन रुग्‍णांचा समावेश आहे. यापूर्वी गेल्‍या २८ जुलैला दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या अवघी १६९ होती. त्‍यानंतर मात्र ही संख्या चारशेहून अधिकच असायची. ऑगस्‍टनंतर सुमारे ४८ दिवसांनी ऑक्‍टोबरमध्ये पाचशेहून कमी रुग्‍णसंख्या आढळून येत होती. सोमवारी चारशेपेक्षा कमी रुग्‍ण आढळल्याने नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १६२, नाशिक ग्रामीणचे १२६, मालेगावचे २३, तर जिल्‍हाबाह्य सहा रुग्णांचा समावेश आहे. तर नऊ मृतांमध्ये पाच नाशिक शहरातील असून, तीन नाशिक ग्रामीणचे व एक रुग्ण मालेगाव महापालिका हद्दीतील आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८९ हजार ६३६ झाली असून, यापैकी ८१ हजार ३७८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक हजार ६१० रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५३०, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४९, मालेगाव रुग्‍णालये चार, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन संशयित दाखल झाले आहेत. 

मालेगावची रुग्णसंख्या घटली 

मालेगाव : शहरासह तालुक्यातील तीन कोरोनाबाधित व एक संशयित अशा चौघांचा गेल्या २४ तासांत महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोन दिवसांत चौघांचा मृत्यू व त्यातच मुंगसे येथील ३३ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमुळे चिंतेत भर पडली आहे. शहरात मात्र अनेक दिवसांनंतर एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या १६४, तर तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या ५८ झाली आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

आठवड्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने समाधान व्यक्त होत असतानाच, मृत्यू वाढल्याने प्रशासनाला सतर्कता बाळगावी लागणार आहे. शहर व तालुक्यात सोमवारी नव्याने नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी ९१.५१ झाली आहे. ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. शहरातील ७२ अहवाल प्रलंबित आहेत.

go to top