तुरुंगातील "आसाराम" बद्दल चक्क महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना धडे....मुख्याध्यापकांना नोटीस!

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

सातपूरच्या अशोकनगर येथील महापालिकेच्या शाळेत वरिष्ठांची परवानगी न घेता तुरुंगात असलेल्या आसारामचा व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर मातृ-पितृदिन साजरा करण्याचे आवाहन आसारामच्या सेवकांनी अशोकनगर शाळेत बुधवारी केले होते. या माध्यमातून आसारामचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप पालकांनी करत संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती.

नाशिक : महापालिकेच्या सातपूर येथील बी. डी. भालेकर शाळेत कथित आध्यात्मिक गुरू आसारामचे धडे देण्यास परवानगी देणारे मुख्याध्यापक युवराज शेलार यांच्यासह दोन शिक्षकांना शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आसारामचा प्रचार करण्यास आलेल्या सेवकांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. 

शाळेत वरिष्ठांची परवानगी न घेताच...

सातपूरच्या अशोकनगर येथील महापालिकेच्या शाळेत वरिष्ठांची परवानगी न घेता तुरुंगात असलेल्या आसारामचा व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर मातृ-पितृदिन साजरा करण्याचे आवाहन आसारामच्या सेवकांनी अशोकनगर शाळेत बुधवारी केले होते. या माध्यमातून आसारामचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप पालकांनी करत संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने दखल घेत मुख्याध्यापकांना जाब विचारला; परंतु या संदर्भात आपला काही संबंध नसल्याचे सांगताना मुख्याध्यापक युवराज शेलार यांनी हात झटकले. ज्या वेळी प्रकार घडला त्या वेळी मुख्याध्यापकांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने प्रशासनाने ज्यांनी परवानगीशिवाय कार्यक्रम घेतला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सूचना दिल्या. मुख्याध्यापकांसह दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

"अंनिस'तर्फे कारवाईची मागणी 
आसारामच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न महापालिकेच्या शाळेतून झाला असून, ही बाब अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याचा निषेध केला आहे. अशा शाळांवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंनिसने महापालिका शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्याकडे केली. निवेदनानुसार, आसारामचे कार्यक्रम पूर्णपणे अवैज्ञानिक व अंधश्रद्धा पसरविणारे असतात. त्यामुळे ही शिक्षणाच्या मूल्याला हरताळ फासला जाण्याची कृती आहे. विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरले जातात. शिवाय आसाराम तुरुंगात असताना निर्दोष आहे, असे सांगणे म्हणजे न्यायालयाचा अपमान आहे. असे कार्यक्रम घेणाऱ्या शाळा व महाविद्यालयांवर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर कार्यकर्ते महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, समीर शिंदे यांच्या सह्या आहेत.  

हेही वाचा > गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकराने चक्क 'तिचा' गर्भपातही केला...त्यानंतर...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lessons for students in a municipal school about "Asaram" in prison Nashik Marathi news