''त्याने' शाप दिला म्हणूनच कोरोनाची साथ पसरलीय!'...अन् महिलांनी चक्क लावलेले दिवे

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

तृतीयपंथीयाला मारल्यामुळे करोनाची साथ पसरल्याच्या अफवेने आता जोर धरला आहे. या अफवेचा धागा पकडत करोना होऊ नये म्हणून अंधश्रध्दाळू लोक आमवस्येच्या पार्श्वभूमीवर चक्क पिठाच्या कनकेचे दिवे कडूनिंबाच्या झाडाखाली ठेवत आहेत. या सर्व प्रकाराला अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.

नाशिक : (सिडको) करोनाने सर्वत्र भीतीचे सावट पसरलेले असतांना सिडको भागात वार्‍याच्या वेगाने अफवा पसरत आहे. तृतीयपंथीयाला मारल्यामुळे करोनाची साथ पसरल्याच्या अफवेने आता जोर धरला आहे. या अफवेचा धागा पकडत करोना होऊ नये म्हणून अंधश्रध्दाळू लोक आमवस्येच्या पार्श्वभूमीवर चक्क पिठाच्या कनकेचे दिवे कडूनिंबाच्या झाडाखाली ठेवत आहेत. या सर्व प्रकाराला अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.

त्याने शाप दिला असून त्यानेच कोरोनाची साथ पसरलीय...

करोनाच्या साथीने अनेकांची झोप उडवली आहे. आपल्यालाही करोना होतो की काय अशा भीतीने अनेकांना पछाडले आहे. वारंवार करोनाचेच वृत्त कानावर पडत असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे. त्याची परिणीती म्हणजे अनेकांना आता मानोविकारांनी ग्रासले आहे. दुसरीकडे अनेकांनी देवाचा धावाही सुरु केला आहे. काही ठिकाणी महामृत्यूंजय मंत्र म्हटले जात आहेत. तर काही ठिकाणी अन्य प्रकारच्या अफवांना पेव फुटले आहे. सिडको परिसरात असाच एक संदेश जोरात फिरत आहे. त्यात म्हटले आहे की, एका तृतीयपंथीयाचा छळ करून त्यास कुणीतरी मारल्याने त्याने शाप दिला असून त्यामुळेच कोरोनाची साथ पसरली आहे. आपल्याला व आपल्या कुटूंबाला लागण होऊ नये म्हणून आजच्या अमावस्येच्या पार्श्वभूमीवर कडूनिंबाच्या झाडाखाली कनकेचे दिवे लावल्यास बाधा होणार नाही व कोरोना रोग पळून जाईल असे संदेशात म्हटले आहे. 

हेही वाचा > 'लॉकडाऊन' परिस्थितीत किराणा संपलाय?...चिंता नको हे वाचा​

आजही भंपक अफवांना भीक घातली जातेय...

या अफवेवर विश्वास ठेऊन परिसरातील अनेक अंधश्रद्धाळू महिला व मुलांची कडूनिंबाच्या झाडांखाली दिवे लावण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेकांनी तर दिवाळी प्रमाणे आपल्या घराबाहेरही कणकेचे दिवे लावल्याचे चित्र आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत जग विज्ञानवादी होत असतांना नाशिकमध्ये मात्र आजही अशा भंपक अफवांना भीक घातले जात असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा > मोबाईल हातात न दिल्याचाच राग...अन् त्याने केला धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lights were on by women for blind faith nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: