मोबाईल हातात न दिल्याचाच राग...अन् त्याने केला धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

रविवार कारंजा येथे मोबाईल न दिल्याच्या कारणातून एकाला संशयितांनी मारहाण करीत कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

नाशिक : रविवार कारंजा येथे मोबाईल न दिल्याच्या कारणातून एकाला संशयितांनी मारहाण करीत कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

अशी आहे घटना

मयूर पांडे व त्याचा भाऊ (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी वैभव राजेश लोळगे (रा. रविवार कारंजा) यांच्या फिर्यादीनुसार वैभव मावसभावासोबत शुक्रवारी (ता.20) रात्री रविवार कारंजा येथील गीताई स्नॅक सेंटर येथे बसला होता. त्या वेळी संशयित मयूर पांडे व त्याच्या भावाने लोळगे याच्याकडे मोबाईल मागितला असता त्याने दिला नाही. 'मला तू मोबाईल का देत नाही?' यावरुन त्या दोघांत वादावादी झाली. या वादाचा परीणाम असा झाला की, मनात राग धरून दोघा संशयितांनी वैभव यास मारहाण करीत पांडे याने कोयत्याने डोक्‍यावर वार करून पोबारा केला. 

हेही वाचा > 'लॉकडाऊन' परिस्थितीत किराणा संपलाय?...चिंता नको हे वाचा​

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक उपनिरीक्षक धात्रक तपास करीत आहेत. 

हेही वाचा > COVID-19 : सिव्हिलमध्ये "कोविड-19'' व्यवस्थापन कक्ष...24 तास सुरू राहणार 'वॉर रूम'!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharp weopan attack on not giving mobile nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: