मेकअप कसा करू? कोरोनामुळे आडवा आला मास्कचा पडदा...

makeup.jpg
makeup.jpg

नाशिक : चेहऱ्याचे सौंदर्य खुलावे म्हणून तरुणाईमध्ये फेस पावडर, क्रीम्स, लिपस्टिक यांसह विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र कोरोनामुळे तीन महिन्यांपासून नियमित मास्क वापरणे, लॉकडाउनमुळे घराबाहेर न पडणे, लग्न, तसेच विविध समारंभ रद्द होण्याचा परिणामामुळे सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीमध्ये घट झाली असून, तीन महिन्यांत सुमारे 21 कोटींचा फटका बसला आहे. 

सौंदर्यप्रसाधन विक्रेत्यांना लॉकडाउनचा फटका 
अलीकडच्या काळात वाढत्या चंगळवादामुळे सौंदर्याला खूप महत्त्व दिले जात आहे. सुंदर दिसावे, असे प्रत्येकालाच वाटते. तरुणाईंपासून महिला व मुलांमध्येही सौंदर्यप्रसाधने वापरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. पूर्वी फक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर उच्च वर्गापुरताच मर्यादित होता. आता सर्व स्तरांतील महिला-पुरुष सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. फेसपॅक, फेसियल, ब्लिच, पावडर, लिपस्टिक, विविध प्रकारच्या फेस क्रिम यांसह शेकडो प्रकारचे सौंदर्यप्रसाधनांची बाजारात विक्री होते. टीव्ही, मोबाईल, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीचा माराही ग्राहकांवर केला जात असल्याने त्याविषयी आपोआप आकर्षण वाढत गेले.

लग्न समारंभ, कार्यक्रम रद्दचा परिणाम 

महिन्याकाठी एक ते पाच हजारांपर्यंत साधारणपणे खर्च केला जातो. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे कोणीही घराबाहेर पडत नाही. आता काही कार्यालये, कारखाने, खासगी आस्थापने सुरू झाले. मात्र तीन महिने बंद असल्याने, तसेच कोरोनामुळे मास्क वापरावा लागत असल्याने सौंदर्यप्रसाधनांचा वापर कमी झाला. लग्न, वाढदिवस, तसेच इतर समारंभही घरगुती स्वरूपात होत असल्याने त्याचाही मोठा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. 

तोटा सहन करावा लागतोय

वाढदिवस, विवाह सोहळे, तसेच इतर समारंभही होत नसल्याने सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे माल येत नसल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. दुसरीकडे सौंदर्यप्रसाधनांची फक्त 30 टक्केच विक्री होत असल्याने तोटा सहन करावा लागत आहे. -कैलास तलरेजा, रॉयल कॉस्मेटिक्‍स, नाशिक 

लॉकडाउनमुळे पूर्ण वेळ घरातच थांबावे लागत आहे. महाविद्यालयदेखील बंदच आहेत. इतर समारंभ बंद आहेत. पूर्ण वेळ घरात असल्याने सौंदर्यप्रसाधने वापरण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांवरील खर्चही वाचत आहे. -कावेरी शिरसाठ, नाशिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com