esakal | रमजान ईदनंतर मालेगावात यंत्रमाग होणार सुरू? अनेक प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत 
sakal

बोलून बातमी शोधा

yantramag.jpgyantramag.jpg

कामगारही लॉकडाउनमुळे त्रस्त आहेत. यंत्रमाग व पान, विडी, सिगारेट, चहा कामगारांचे जीव की प्राण. यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यास काही प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल. शासन निर्देशानुसार महापालिका कंटेन्मेंट झोनचा सुधारित आराखडा व नियोजन करीत असल्याचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. "सकाळ'ने "मालेगाव की घुटन' या मालिकेतून यंत्रमाग सुरू होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

रमजान ईदनंतर मालेगावात यंत्रमाग होणार सुरू? अनेक प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत 

sakal_logo
By
प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : शहराचे अर्थकारण यंत्रमाग व्यवसायावर केंद्रित आहे. दोन लाख यंत्रमाग, दीड लाख कामगार व रोज सुमारे एक कोटी मीटर कापडनिर्मिती हा शहराचा श्‍वास आहे. दोन महिन्यांपासून यंत्रमाग बंद असल्याने शहराचे अर्थकारण बिघडले आहे. ही बाब लक्षात घेऊन काही नियम व अटी- शर्थींना अधीन राहत यंत्रमाग सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यात कंटेन्मेंट झोनमधील यंत्रमाग बंद असतील व कंटेन्मेंट क्षेत्रातील कामगार कामावर जाऊ शकणार नाहीत. या दोन प्रमुख अटी आहेत. या निर्णयामुळे शहरातील 60 टक्के यंत्रमाग रमजान ईदनंतर सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

लॉकडाउनमुळे त्रस्त कामगारांना दिलासा 
येथील कामगारही लॉकडाउनमुळे त्रस्त आहेत. यंत्रमाग व पान, विडी, सिगारेट, चहा कामगारांचे जीव की प्राण. यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यास काही प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल. शासन निर्देशानुसार महापालिका कंटेन्मेंट झोनचा सुधारित आराखडा व नियोजन करीत असल्याचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. "सकाळ'ने "मालेगाव की घुटन' या मालिकेतून यंत्रमाग सुरू होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याची दखल घेऊन आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल यांच्याशी चर्चा केली होती. यंत्रमाग मालकही अडचणीत असताना याबाबत सकरात्मक आहेत. 

शासनाने पुढाकार घेतल्यास प्रश्न मार्गी लागतील
शासनाने यंत्रमाग व्यवसायाला आधार देण्यासाठी सहा महिन्यांचे वीजबिल माफ करावे. केंद्र शासनाच्या योजनेद्वारे सूत बॅंकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज दिल्यास या व्यवसायाला संजीवनी मिळू शकेल, असे मत पॉवरलूम ऍक्‍शन कमिटीचे अध्यक्ष युसूफ इलियास यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज


यंत्रमागाला प्रामुख्याने दक्षिणेकडील केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व विदर्भातील नागपूरसह गुजरातमधून सूतपुरवठा होतो. व्यवसाय सुरू होण्यासाठी सूतपुरवठा व ट्रान्स्पोर्टची सोय व्हावी. येथील यंत्रमागावर निर्मित कापड प्रक्रियेसाठी (प्रोसेस) पाली, बालोत्रा, सुरत, अहमदाबाद, मुंबई, डोबिंवली, कोलकाता येथे जाते. येथील प्रोसेस युनिट सुरू होणे गरजेचे आहे. लग्नसराई व रमजानचा सीझन संपला. प्रोसेसिंग युनिटमध्ये कापड पडून आहे. पावसाळ्यात मुळातच मंदी असते, तरी शासनाने पुढाकार घेतल्यास यंत्रमाग सुरू होऊ शकतील.  

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा