"पोलीसदादा..! मालकीणीने कामावर बोलावलयं..आम्हाला कसलं आलयं हो "जनता कर्फ्यू"...अखेर बोलवलेच तिला कामाला!

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 23 मार्च 2020

जगभर कोरोना विषाणूने कहर माजविलेला असताना, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (ता.22) देशभरात "जनता कर्फ्यू' होता. यामुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. दरम्यान, सिटी सेंटर मॉल सिग्नल ओलांडून एक महिला तिच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन पायीच जात होती. त्या वेळी या सिग्नलवर वाहतूक शाखेचे हवालदार महाजन, सोमनाथ झोले आदी कर्तव्य बजावत होते. त्यांनी त्या महिलेला रोखले आणि..

नाशिक : चिमुकल्याला कडेवर घेऊन एक महिला सिटी सेंटर मॉलचा सिग्नल ओलांडून जात असताना, तिला वाहतूक पोलिसांनी रोखले आणि घरी जाण्याची सूचना केली. परंतु जेव्हा तिने घराबाहेर पडण्याचे कारण सांगितले. त्या वेळी मात्र पोलिसही अवाक्‌ झाले. ती महिला मोलकरीण होती आणि तिच्या मालकीणीने तिला "जनता कर्फ्यू' असतानाही कामावर बोलाविले होते. 

वाहतूक पोलिसांनी सांगूनही बोलाविले मोलकरणीला 
जगभर कोरोना विषाणूने कहर माजविलेला असताना, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (ता.22) देशभरात "जनता कर्फ्यू' होता. यामुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. दरम्यान, सिटी सेंटर मॉल सिग्नल ओलांडून एक महिला तिच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन पायीच जात होती. त्या वेळी या सिग्नलवर वाहतूक शाखेचे हवालदार महाजन, सोमनाथ झोले आदी कर्तव्य बजावत होते. त्यांनी त्या महिलेला रोखले आणि घरी जाण्याचा सल्ला दिला. त्या वेळी महिला म्हणाली, की दादा मी मोलकरीण असून, घराबाहेर निघणार नव्हती. पण मालकिणीने बोलावले म्हणून चालली आहे.' त्याचवेळी त्या महिलेच्या फोनवर तिच्या मालकिणीचा फोन आला. त्या महिलेने तो फोन हवालदाराकडे दिला. त्या वेळी त्यांनी त्या मालकिणीला "जनता कर्फ्यू' असून, असे मोलकरणीला तुम्ही बोलवायला नको होते. शासनाच्या आदेशाचे तर पालन करा' असे सांगितले, तरीही तिकडून मालकीण काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. उलट आता आलीच आहे तर घर जवळच आहे, येऊ द्या तिला' असे उलट उत्तरही दिले. त्यामुळे अखेर पोलिसांनी वाद न वाढविता त्या महिलेला मालकिणीकडे जाऊ दिले. 

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maid went on duty During the public curfew Nashik Marathi news

टॅग्स
टॉपिकस