esakal | शेतकऱ्यांना दिलासा! मालेगावला मक्याला सर्वोच्च १५०१ रुपये बाजारभाव
sakal

बोलून बातमी शोधा

maka.jpeg

येवला येथे मका आवकेत व भावात वाढ झाली. आवक वाढूनही बाजारभाव ९४० ते एक हजार ४५० तर सरासरी एक हजार ३०१ रुपये असा हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला.  

शेतकऱ्यांना दिलासा! मालेगावला मक्याला सर्वोच्च १५०१ रुपये बाजारभाव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मालेगाव (नाशिक) : येथील बाजार समितीत शनिवारी (ता.३१) मक्याला सर्वोच्च एक हजार ५०१ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. बाजार समितीत मका आवक वाढू लागली आहे. शनिवारी झालेल्या मका लिलावात कोरड्या मक्यास कमीत कमी एक हजार ४००, तर जास्तीत जास्त एक हजार ५०१ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. 

हंगामातील सर्वोच्च भाव

ओल्या मक्यास कमीत कमी एक हजार ३००, तर जास्तीत जास्त एक हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. मका आवक पाच हजार क्विंटल होती. तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य आवारात मका विक्रीसाठी आणावा व मक्यास मिळत असलेल्या चांगल्या बाजारभावाचा फायदा करुन घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, सचिव अशोक देसले, व्यापारी भिका कोतकर यांनी केले. येवला येथे मका आवकेत व भावात वाढ झाली. आवक वाढूनही बाजारभाव ९४० ते एक हजार ४५० तर सरासरी एक हजार ३०१ रुपये असा हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला.  

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास