"शुरवात तो हुई, उम्मीद तो जगी' मालेगावमध्ये अखेर यंत्रमागांचा खडखडाट सुरू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

सोमवारपर्यंत सुमारे पन्नास हजारांहून अधिक यंत्रमाग सुरू होतील, असा विश्‍वास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक व समन्वय अधिकारी सुनील कडासने यांनी व्यक्त केला. प्रामुख्याने शहरातील द्याने, आझादनगर, म्हाळदे शिवार, सवंदगाव, देवीचा मळा व शहराबाहेरील महामार्गाला लागून असलेले यंत्रमाग सुरू झाले.

नाशिक :  शहरातील अर्थकारणाचा कणा असलेला यंत्रमागांचा खडखडाट हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर शनिवारी (ता. 30) येथील सुमारे 12 हजारांहून अधिक यंत्रमाग सुरू झाले. त्यामध्ये पाच हजार कामगार कामावर गेले. यंत्रमागमालक, कामगार, यार्न मर्चंट व प्रशासनाने "शुरवात तो हुई, उम्मीद तो जगी', अशी भावना व्यक्त केली. 

"शुरवात तो हुई, उम्मीद तो जगी'
सोमवारपर्यंत सुमारे पन्नास हजारांहून अधिक यंत्रमाग सुरू होतील, असा विश्‍वास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक व समन्वय अधिकारी सुनील कडासने यांनी व्यक्त केला. प्रामुख्याने शहरातील द्याने, आझादनगर, म्हाळदे शिवार, सवंदगाव, देवीचा मळा व शहराबाहेरील महामार्गाला लागून असलेले यंत्रमाग सुरू झाले. ज्या कारखान्यात तयार कापड गाठी कमी प्रमाणात शिल्लक आहेत, पेमेंट मिळाले व तयार सूत बिम पडलेले आहेत अशा काही मोजक्‍या मालकांनी कारखाने सुरू केल्याचे यंत्रमागमालकांच्या प्रतिनिधींनी सांगितले. प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजना करून, मार्केटचा अंदाज घेत, पाली बालोत्रा माल जावू लागताच उर्वरित यंत्रमाग सुरू होतील. प्रारंभी कामगारांना प्रसंगी दोन टप्प्यांत तीन-तीन दिवस आलटून पालटून काम देण्याचे नियोजन काही मालक करत आहेत. 

मालेगावमध्ये 12 हजार यंत्रमागांचा खडखडाट सुरू 
सायजिंग सुरू झाल्यास अडचणी दूर होतील. सूतपुरवठ्यात अडचण नाही. तथापी यंत्रमागमालक, यार्न मर्चंट व कामगार असा समन्वय असणे आवश्‍यक आहे. प्रशासनातर्फे पोलिस, महसूल व मनपा असे एकत्रित पथक कारखान्यांना भेटी देऊन पाहणी करीत आहेत. श्री. कडासने यांनी वेगवेगळ्या कारखान्यांत भेटी देत मालकांना थर्मल मीटर व ऑक्‍सिपल मीटर ठेवावे यांसह प्रशासनातर्फे विविध सूचना दिल्या. सर्व उपाययोजना करण्यास व कामगारांना सर्व सोपस्कार अंगवळणी पडण्यास काही कालावधी लागेल, असे काही मालक व कामगारांनी सांगितले. 

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

यंत्रमागमालक व कामगारांना सचना 
* कारखान्यात तपासणीसाठी थर्मल व ऑक्‍सिपल मीटर आवश्‍यक 
* यंत्रमाग कामगारांनी एका ताटात एकत्रित जेवू नये 
* कारखाना व परिसरात जवळजवळ बसून गप्पा मारू नये 
* चहाची सोय कारखान्यात करावी 
* शौचालय, स्वच्छतागृह वेळोवेळी शेती पाठपंपाने स्वच्छ करावे 
* कारखान्यातील वस्तू सॅनिटाइज कराव्यात 
* मालक, कामगारांनी हात वेळोवेळी धुवावेत 
* सोशल डिस्टन्सिंग राखावे  

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Malegaon 12 thousand machine looms starting nashik marathi news