चिंताजनक! मालेगावला कोरोनाबळींचे अर्धशतक...'त्या' संशयित मृतांचे अहवाल पॉझिटिव्ह!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

मालेगाव शहरातील कोरोनाबाधित बळींच्या संख्येने अर्धशतक ओलांडले आहे. दहा दिवसांत मृत्यू झालेल्या पाच संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबळींची संख्या इतकी झाली आहे. अद्याप संशयित मृतांची संख्या 73 आहे. 

नाशिक : (मालेगाव) शहरातील कोरोनाबाधित बळींच्या संख्येने अर्धशतक ओलांडले आहे. दहा दिवसांत मृत्यू झालेल्या पाच संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबळींची संख्या इतकी झाली आहे. अद्याप संशयित मृतांची संख्या एवढी आहे. 

मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

शुक्रवारी (ता.29) दिवसभरातील दोन अहवालांत 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले. एकूण रुग्णसंख्या 785 झाली आहे. नव्याने आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील पूर्व- पश्‍चिम दोन्ही भागांतील रुग्णांचा समावेश आहे. यापूर्वी संशयित असलेल्या मात्र मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या पाच जणांमध्ये चार पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. यातील इस्लामनगर भागातील 54 वर्षीय, पवारवाडी 65 वर्षीय, जयहिंद कॉलनीतील 69 वर्षीय व इक्‍बाल डाबी भागातील 51 वर्षीय असे चार पुरुष आहेत. जाफरनगर भागातील 51 वर्षीय महिलेचा यात समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले. दहा दिवसांत मृत्यू झालेल्या पाच संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबळींची संख्या 52 झाली आहे. अद्याप संशयित मृतांची संख्या 73 आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! मैत्रीला नकार देताच युवकाकडून अमानुष प्रकार

शुक्रवारी आलेल्या रुग्णांमध्ये दोन मुंबई रेल्वे पोलिस, आयेशानगर भागातील तीन, गुलाब पार्क, अब्दुल्लानगर येथील प्रत्येकी दोन व हजारखोली, कुंभारवाडा, नूरबाग, रमजानपुरा, व्यंकटेशनगर भागातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यात प्रत्येकी सात महिला व पुरुष आहेत.

हेही वाचा > मोडून पडला 'संसार' तरी, मोडला नाही कणा...हो 'त्यांनी' करुन दाखवलं...एकदा वाचाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon Corona 52 victims; Five suspected deaths reported corona positive nashik marathi news