esakal | पोलिस अधिकारी, कर्मचारीच नव्हे तर संशयित आरोपीदेखील पॉझिटिव्ह...कुठे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

corona-virus-getty.jpg

शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र बघता-बघता येथील रूग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे शनिवारी आढळलेल्या रूग्णांमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारीच नव्हे, तर चार संशयित आरोपींचाही समावेश आहे. 

पोलिस अधिकारी, कर्मचारीच नव्हे तर संशयित आरोपीदेखील पॉझिटिव्ह...कुठे ते वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र बघता-बघता येथील रूग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे शनिवारी आढळलेल्या रूग्णांमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारीच नव्हे, तर चार संशयित आरोपींचाही समावेश आहे. 

चंदनपुरीतही नव्याने रुग्ण

मालेगाव शहर व परिसरात शनिवारी नव्याने 35 कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यानुसार तालुक्‍यातील जळकू, झोडगे येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या शिवाय चंदनपुरीतही नव्याने रुग्ण मिळून आला आहे. ब्राह्मणपाडा (ता. बागलाण) येथील एका रुग्णाचाही त्यात समावेश आहे. तर, उर्वरित रुग्ण शहरातील आहेत. या रुग्णांमध्ये तालुका पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांसह एक दोन नव्हे, तर तब्बल चार संशयित आरोपींचेही अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

हेही वाचा > VIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नव्याने आढळून आलेले रुग्ण शहराच्या चोहोबाजूचे व सर्व विभागातील आहेत. यात 24 पुरुष व 11 महिला असून, जूनमधील आतापर्यंतचे हे सर्वाधिक रुग्ण आहेत. दरम्यान, नव्याने 17 रुग्ण दाखल झाले. तर, जवळपास 300 अहवाल प्रलंबित आहेत. 64 ऍक्‍टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा > आनंदवार्ता! जिल्ह्यातील 'हे' चार तालुके झाले कोरोनामुक्‍त...एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही