मग काय.. नाशिकच्या चोरांना मालेगावकरांनी बेदम चोपले..! काय घडले नेमके?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

इंडिका कारमधून दोघे संशयित फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना हटकले. विचारणा केली असता, ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते. जमावाचे लक्ष कारकडे गेले असता त्यात त्यांना जे काही दिसले. ते पाहून जमावाचा पारा चढला. असे काय घडले?

नाशिक / मालेगाव : इंडिका कारमधून दोघे संशयित फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना हटकले. विचारणा केली असता, ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते. जमावाचे लक्ष कारकडे गेले असता त्यात त्यांना जे काही दिसले. ते पाहून जमावाचा पारा चढला. असे काय घडले?

असा घडला प्रकार 
इंडिका कारमधून दोघे संशयित फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना हटकले. विचारणा केली असता, ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते. जमावाचे लक्ष कारकडे गेले असता त्यात शेळ्या दिसल्या. या भागातून शेळ्या चोरी गेल्याने जमावाचा पारा चढला. त्यांनी कारची तोडफोड करत चोरट्यांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. बकरी ईदच्या पाश्‍‍र्वभूमीवर शहरातील पूर्व भागातून शेळ्या चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना जमावाने पकडून चोप देत आझादनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांच्या ताब्यातून इंडिका कार (एमएच १५, एएस २७४८), वीस हजार रुपये किमतीच्या पाच शेळ्या, असा सुमारे दीड लाखाचा ऐवज जप्त केला. आझादनगर भागातील आझाद रोडवरील खान कलेक्शनसमोर रविवारी (ता. १९) दुपारी हा प्रकार घडला. जमावाच्या मारहाणीत दोघे किरकोळ जखमी झाले. 

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार

शेळी चोरी केल्याची कबुली

पोलिसांनी चौकशी केली असता, शहराच्या वेगवेगळ्या भागातून चार व आझादनगर भागातून एक शेळी चोरी केल्याची कबुली दिली. मुख्तार इम्रान शेख (वय ४०, रा. वडाळानाका, नाशिक) आणि निसार इब्राहीम शेख (वय ४२, रा. भद्रकाली नाशिक) अशी दोघा भामट्यांची नावे आहेत.

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

पाच दिवसांची पोलीस कोठडी 
आज त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शहर व परिसरातून गेल्या आठ दिवसांत पंधरापेक्षा अधिक शेळ्याची चोरी झाली आहे. आझादनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पाच शेळ्यांपैकी दोन शेळींचे मालक मिळून आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon residents beat Nashik thieves nashik marathi news