ह्रदयद्रावक कहाणी! आयुष्यात एखाद्या धक्‍क्‍याने कुटुंब उद्‌ध्वस्त..अन् पोलीसांनी मात्र....

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 8 February 2020

मोहाली येथील संजय बिशनदास अरोरा (वय 45) यांना व्यापारात दीड कोटीचे नुकसान झाल्याने त्यांची मनस्थिती बिघडल्याने ते पत्नी, मुलांना सोडून कुटुंबापासून परागंदा होऊन बेपत्ता असल्याची माहिती दिली. मोबाईल लोकेशननुसार संबंधित व्यावसायिक अमृतसर एक्‍स्प्रेस (अप) 
ने अमृतसर ते दादर प्रवास करीत असल्याची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना कळविली. 

नाशिक : पोलिस फक्त गुन्हेच दाखल करतात, असे नाही तर अनेकदा ते कुटुंबही जोडतात, असा अनुभव नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नामुळे आला. व्यापारात झालेल्या दीड कोटीच्या नुकसानीमुळे नैराश्‍य आल्याने घरातून परागंदा झालेल्या व्यावसायिकाला शोधून त्याचे समुपदेशन करीत, पुन्हा पंजाबमधील त्याच्या कुटुंबात सुखरूप रवाना करीत 
नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी एक कुटुंब तुटण्यापासून वाचविले. 

संबंधिताची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी

दीड दिवस संबंधिताची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेत झाले गेले विसरून पुन्हा घरी परतण्याचे पोलिसांचे आर्जव सत्कारणी लागल्यानंतर गुरुवारी (ता.6) संबंधिताला निरोप दिला. मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकावर बुधवारी (ता. 5) दुपारी दोनच्या सुमारास मोहाली (चंदीगड, पंजाब) येथून मोहाली पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती सिमरन यांचा दूरध्वनी आला. त्यांनी मोहाली येथील संजय बिशनदास अरोरा (वय 45) यांना व्यापारात दीड कोटीचे नुकसान झाल्याने त्यांची मनस्थिती बिघडल्याने ते पत्नी, मुलांना सोडून कुटुंबापासून परागंदा होऊन बेपत्ता असल्याची माहिती दिली. मोबाईल लोकेशननुसार संबंधित व्यावसायिक अमृतसर एक्‍स्प्रेस (अप) 
ने अमृतसर ते दादर प्रवास करीत असल्याची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना कळविली. 

पती-पत्नीचे समुपदेशन करून कुटुंब सुखरूप पंजाबला रवाना

नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार जावेद शेख यांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक जाधव यांना याबाबत सांगितल्यानंतर रेल्वे पोलिसांनी हवालदार सुभाष कुलकर्णी व पोलिस शिपाई गोकुळ भगत यांच्या मदतीने पंजाब एक्‍स्प्रेसमध्ये पिंजून घर सोडलेल्या अरोरा यांचा शोध घेत, अप अमृतसर एक्‍स्प्रेसमधील व्यावसायिकाला रेल्वे पोलिस ठाण्यात आणून त्यांना धीर दिला. दीड दिवस त्यांचे समुपदेशन करीत, नाशिक रोड पोलिसांनी पंजाबला दूरध्वनी करून त्यांच्या पत्नी राजश्री संजय अरोरा (41) यांना दूरध्वनीवरून माहिती देत नाशिक रोडला तातडीने बोलावून घेतले. गुरुवारी (ता. 6) दुपारी चारला त्या रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पती-पत्नीचे समुपदेशन करून कुटुंब सुखरूप पंजाबला रवाना केले. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

याचा वेगळा आनंद आहे
आयुष्यात एखाद्या धक्‍क्‍याने कुटुंब उद्‌ध्वस्त होते. अरोरा कुटुंब आर्थिक धक्‍क्‍यामुळे जवळपास त्या मार्गावर होते. कुटुंबापासून दूर चाललेल्या व्यावसायिकाला पुन्हा धीराने त्यांच्या कुटुंबात सहभागी करण्यात आमचे प्रयत्न कामी आले. याचा वेगळा आनंद आहे. - अशोक जाधव, प्रभारी रेल्वे पोलिस ठाणे

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man returned to the family because of nashik railway police Marathi Motivational news