"किमान पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी द्या" ; तालुका मंडप असोसिएशनची मागणी

पोपट गवांदे
Friday, 9 October 2020

सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी मंडप, कार्यालय हॉल, लॉन्सच्या ठिकाणी किमान पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी मिळावी,

इगतपुरी शहर (नाशिक) : सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी मंडप, कार्यालय हॉल, लॉन्सच्या ठिकाणी किमान पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी मिळावी, यासाठी इगतपुरी तालुका मंडप डेकोरेटर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी (ता. ८) तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. 

सात-आठ महिन्यांपासून हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ
कोरोनामुळे देशातील सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून, मंडप डेकोरेटर्सच्या कुटुंबांवरही आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने अर्थसहाय्य मदतीचे धोरण घ्यावे, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना किमान पाचशे लोकांच्या उपस्थितीला प्राधान्य द्यावे, याची काळजी घेऊनच पुढील कार्य पार पडतील, अशा योजनेला परवानगी देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल. सात-आठ महिन्यांपासून हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

अध्यक्ष प्रमोद भडांगे, उपाध्यक्ष तात्या पाटील भागडे, कोशाध्यक्ष भगवान बोंडे, सचिव गोविंद शर्मा, सल्लागार उत्तम गायकर, सदस्य काशीनाथ डावखर, विलास वालझाडे, गौतम शिरसाट, रणबीर ढकोलिया, तुळशीराम म्हसणे, गणपत भागडे, संजय वालझाडे, शाहरुख तांबोळी आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandap Association Demand Allow presence of at least five hundred persons nashik marathi news