नवरात्रौत्सवात मंडप-पेंडॉलची होणार तपासणी; मालेगावात पाच पथके नियुक्त

प्रमोद सावंत
Wednesday, 14 October 2020

पथक मंडप, पेंडाॅल तपासणीबरोबरच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होते की नाही याबाबत तपासणी करेल.

नाशिक/मालेगाव : आगामी सार्वजनिक नवरात्रोत्सव सण, उत्सव, सभारंभ यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉलच्या तपासणीसाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महानगरपालिका हद्दीतील मंडप व पेंडॉलची तपासणी करण्याची जबाबदारी या पाच पथकांवर असेल. शर्मा यांचा स्वत: एका पथकात समावेश आहे. प्रत्येक पथकात चौघा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

असे असतील पथकं

शर्मा यांच्या पथकात पुरवठा निरीक्षक पी. बी. मोरे, मनपा कनिष्ठ अभियंता शांताराम चौरे, पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले यांचा समावेश आहे. तहसिलदार चंद्रजित राजपूत यांच्या पथकात निवडणूक नायब तहसिलदार धर्मेद्र मुल्हेरकर, प्रभाग अधिकारी हरिष डिंबर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर पाटील आहेत. उर्वरित तीन पथकांमध्ये पथक प्रमुख गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, निवडणूक नायब तहसिलदार रमेश वळवी, मनपा पाणी पुरवठा उपअभियंता सचिन माळवाळ, द्याने- रमजानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, पथक प्रमुख तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, मंडळ अधिकारी एल. एम.निकम, मनपा कनिष्ठ अभियंता मंगेश गवांदे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे, पथक प्रमुख मनपा सहाय्यक आयुक्त वैभव लोंढे, नायब तहसिलदार दिलीप वाणी, मनपा कनिष्ठ अभियंता एम. एच. देवरे, किल्ला पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांचा समावेश आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन याबाबत तपासणी

हे पथक मंडप, पेंडाॅल तपासणीबरोबरच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होते की नाही याबाबत तपासणी करेल. दरम्यान दसऱ्याला होणाऱ्या रावण दहानाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरूपाचा करावा. यासाठी मोजक्या व्यक्तींनीच उपस्थित रहावे, शहरवासिय व रावण दहन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी करु नये. त्याऐवजी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करावी असे आवाहन श्री. शर्मा यांनी केले आहे.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandap-Penndel will be inspected during Navratri malegaon nashik marathi news