हमाल बापाच्या कष्टाला यश...परिस्थितीची जाण ठेवत लेकीची उत्तुंग भरारी!

सुनील तोकडे : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 July 2020

मंदासह पाच बहिणी, दोन भाऊ, वडील हे कुटुंबाचा चरितार्थ हमाली करून चालवतात. मंदाला आपल्या कौटुंबिक परिस्थितीची जाणिव असल्याने तसेच कुठलेही शैक्षणिक वातावरण नसताना इयत्ता 9 वी पासून तिने प्रथम क्रमांक पटकात होती. सर्व स्पर्धांमध्ये देखील तीचा सहभाग असायचा

नाशिक / मुंढेगाव : मंदासह पाच बहिणी, दोन भाऊ, वडील हे कुटुंबाचा चरितार्थ हमाली करून चालवतात. मंदाला आपल्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव असल्याने तसेच कुठलेही शैक्षणिक वातावरण नसताना इयत्ता 9 वी पासून तिने प्रथम क्रमांक पटकात होती. सर्व स्पर्धांमध्ये देखील तीचा सहभाग असायचा

सीए बनण्याची तीव्र इच्छा

मविप्र संचलित इगतपुरी तालुक्यातील जनता विद्यालय व ज्यु. कॉ. घोटीच्या 12 वी वाणिज्य शाखेत मंदा नामदेव दुभाषे ही विद्यार्थीनी 83.25 टक्के गुण मिळवून प्रथम आली. मंदासह पाच बहीणी दोन भाऊ वडील नामदेव वाळू दुभाषे हे कुटुंबाचा चरितार्थ हमाली करून चालवतात. मंदाला आपल्या कौटुंबिक परिस्थितीची जाणिव असल्याने तसेच कुठलेही शैक्षणिक वातावरण नसताना इयत्ता 9 वी पासून तिने प्रथम क्रमांक पटकात होती सर्व स्पर्धांमध्ये देखील तीचा सहभाग असायचा.घोटीलगत असलेले औचीतवाडी गावाहून रोज ती ये-जा करते.तिला अकाऊंट विषयात गति असल्याने तिला सीए बनण्याची तीव्र इच्छा असली तरी कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ती याबाबत उघडपणे बोलून दाखवत नाही.

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

तिचे विशेष अभिनंदन
तिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल मविप्र संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खातळे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. पुढील शिक्षणासाठी तिला मदत करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले सर्वांचे मार्गदर्शन लाभले. 

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

रिपोर्टर - सुनील तोकडे

(संपादन - ज्योती देवरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manda,s Success fullfill to the hard work nashik marathi news