मनुष्यबळाची मर्यादा हटली...उद्योग पुन्हा "तीन शिफ्ट'मध्ये! 

industry.jpg
industry.jpg

नाशिक / सातपूर : लॉकडाउनच्या काळात उद्योगांपुढील समस्यांवर तोडगा म्हणून मनुष्यबळाची मर्यादा हटविण्यात आल्याने उद्योग पुन्हा तीन शिफ्टमध्ये पूर्ववत सुरू होण्याची शक्‍यता बळावली आहे. त्यामुळे उद्योजकांसह कामगार वर्गातही समाधान पसरले असून, उद्योगांना चालना मिळाल्यास अर्थचक्रही गती घेऊ शकेल, अशी भावना व्यक्त होत आहे. 

नाशिकमधील जीवनमान पूर्ववत होईल
कामगारांच्या 12 तासांच्या शिफ्टमुळे अनेक समस्या निर्माण होत असून, काही कामगारांना काम मिळते तर काहींना वंचित राहावे लागते. तसेच मनुष्यबळ व्यवस्थापनातही अनेक अडचणी जाणवत आहेत. याबाबत निमा, आयमा यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. त्यावर प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आवश्‍यकता भासल्यास उद्योग पूर्ववत तीन शिफ्टमध्ये चालविले जाऊ शकतात व मनुष्यबळाची मर्यादा असणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई व सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य असेल, अशी माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव व मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर थांबलेले उद्योगचक्र पुन्हा गतिमान होऊन नाशिकमधील जीवनमान पूर्ववत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा > मालेगावच्या रुग्णाचा व्हॉटसऍपने लागला शोध.. समजले तेव्हा कुटुंबियांना धक्का! 

लाखो कामगारांना रोजगार 
महिंद्रा, बॉश, सीएट, एबीबी, सिमेन्स, नीलय, ईपिरॉक, जिदांल, हिंदुस्तान लिवर, जनरल मटेलाझर, व्हीआयपी यांसह जिल्हाभरातील जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये 40 हजारांवर कामगार कामावर आल्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच शुक्रवार (ता. 15)पासून मनुष्यबळाची मर्यादा हटविण्यात आल्याने तीन शिफ्ट सुरू होणार आहेत. त्यामुळे लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com