ह्रदयद्रावक चित्र! माऊलीच्या पायाला जखमा.. पोळले तळवे.. पण बाळाला दारिद्रयाचे चटके नको!

mother viral.jpg
mother viral.jpg

नाशिक : आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई' होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. कोरोनाने जगात धूमाकूळ घातले असतानाच दुपारी उन्हाने तापलेल्या महामार्गावरून शेकडो मैल लांब असलेल्या गावाकडे चाललेल्या मायलेकांचे चित्र सोशल मिडीयावर फिरते आहे. 

स्वत:ला पायाला चटके पण मुलासाठी सुखद वाटचाल

डोक्यावर तळपता सुर्य आणि पायाखाली तप्त डांबर तुडवत ते मायलेक निघाले होते. आईने स्वतः अनवाणी होऊन मुलाला चटके सोसणार नाहीत, म्हणून आपल्या चपला मुलाला दिल्या होत्या. डोळ्यापुढे अंधारी आणेल असे हे वास्तव आहे. गेले काही दिवस देशातील सर्वच महामार्गांवर एक वेगळा भारत दिसतो आहे. पोटासाठी महानगरात आलेल्या या महानगराला कोरोनाने त्यांचे भविष्य अंधकारमय केले आहे. त्यामुळे या कोरोनाला शरण न जाता ते आपल्या गावाकडे निघाले. रेल्वे, बस, गाड्या, वाहने कसलीही वाट न पाहता. उत्तर भारतात जायचे असो वा पश्चिम भारतात त्यासाठीचा रस्ता जातो नाशिकमधून. त्यामुळे हे रस्ते गर्दीने रात्रदिवस वाहत आहेत. 

दारिद्रयाचे चटके पुढच्या पिढीला नको म्हणून
भर दुपारी तळपत्या उन्हात उत्तर प्रदेश, बंगाल, बिहारकडे निघालेल्या विविध घोळक्यांत एक माऊली आपल्या मुलाचा हात धरुन अक्षरशः ओढत चाललेली दिसते. हे तसे प्रतिनिधीक चित्र. डोक्यावर तळपणारा सुर्य, पायाखाली तापलेली सडक. त्याच्या चटके सहन करीत, मात्र माझ्या वाट्याला आलेले भुकेचे, दारिद्रयाचे चटके पुढच्या पिढीला नको म्हणून तिने चक्क आपल्या चपला मुलाला घातलेल्या असतात. बारीक लक्ष घातले तरच ते विदारक चित्र नजरेत भरत होते. एकदा नजरेत भरले तर मनाला भिडत होते. मनाला प्रश्न पडायचा, एरव्ही पाणी, जेवण, नाश्ता अन् मदतीसाठी धावणारी राजकीय मंडळी. त्यांची मदत यांच्यापर्यंत पोहोचलीच नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com