नांदगावचा 'झिंगा' ठरतोय गुजराती खवय्यांचे आकर्षण; प्रथिनांसह ‘डी’ जीवनसत्त्वही भरपूर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

तो तुकडा खाण्यासाठी झिंगा पिंजऱ्यात येतो; मात्र त्याला बाहेर पडता येत नाही. पिंजरा बनविण्याचे कामही हे मजूरच करतात. त्या मोबदल्यात त्यांना प्रतिकिलो १०० ते १५० रुपये दिले जातात. हा झिंगा धरणाचा ठेकेदार गुजरातमध्ये मोठी मागणी असल्याने तेथे पाठवतो. 

साकोरा (नाशिक) :  झिंगा, कोळंबी म्हटले तर डोळ्यांसमोर येतो तो समुद्र. मात्र नांदगाव तालुक्यातील मन्याड, नाग्या-साग्या, माणिकपुंज धरणांत गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर झिंगा मिळत आहे. ते पकडण्यासाठी काडीचे पिंजरे करून तेलुगू मजूर सापळे टाकत आहेत.

प्रथिनांसह ‘डी’ जीवनसत्त्वही 
 
नांदगाव तालुक्यातील मन्याड नदीवर असलेल्या मन्याड धरणावर आंध्र प्रदेशातील मजूर एक महिन्यापूर्वी आले आहेत. ते धरणाच्या कडेला राहत आहेत. धरणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने ते मजूर आणले असून, ते काडीचे पिंजरे बनवून ते धरणात सोडतात. काडीचे पिंजरे स्वतः बनवतात. त्यांना कात्रीचे दरवाजे असतात, त्या पिंजऱ्यात खोबऱ्याचा तुकडा अडकवलेला असतो. तो तुकडा खाण्यासाठी झिंगा पिंजऱ्यात येतो; मात्र त्याला बाहेर पडता येत नाही. पिंजरा बनविण्याचे कामही हे मजूरच करतात. त्या मोबदल्यात त्यांना प्रतिकिलो १०० ते १५० रुपये दिले जातात. हा झिंगा धरणाचा ठेकेदार गुजरातमध्ये मोठी मागणी असल्याने तेथे पाठवतो. 

झिंग्यासाठी लागणारा खर्च व उत्पन्न 

झिंग्याचे बीज आंध्र प्रदेश व गुजरातमधून येते. गुजरातच्या बिजाला चांगली मागणी आहे. गुजरातचे झिंगा बिजाची किंमत एक टोकरी ३०० ते ४०० रुपये आहे. एका टोकरीत २०० ते ३०० बीज येतात. एक ते तीन इंचापर्यंत झिंगा बीजचा आकार असतो. झिंगा पकडण्यासाठी लाकडी कड्यांचा पिंजरा करून कैचीचे दरवाजा बनवतात. झिंगा पकडण्यासाठी १०० ते १५० रुपये किलोप्रमाणे मजुरांना मजुरी दिली जाते. झिंग्याचे वजन साधारण शंभर ते चारशे ग्रॅमपर्यंत वजन असते. वजनाप्रमाणे भाव २०० ते ६०० रुपये किलोप्रमाणे जातो. धारणाच्या आकारानुसार झिंगा असतो. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

झिंगा खाण्याचे फायदे 

८५ ग्रॅम झिंग्यामध्ये २० ग्रॅम प्रथिने मिळतात. मिनरल्स व जिंक्सचे प्रमाण जास्त असल्याने केस गळणे थांबते. नजरेसाठी उत्तम असतो. प्रथिनाबरोबरच ‘ड’ जीवनसत्त्व अधिक असल्याने बुद्धी तेज होण्यास मदत होते. झिंग्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्याने चेहऱ्यावर डाग येत नाहीत. तसेच त्वचेस फायदेशीर असतो.  

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

झिंग्याचा पिंजरा कलाकुसरीने बनवावा लागतो. पिंजऱ्याचा दरवाजा कैचीचे बनवावे लागतात. दरवाजा चुकला तर मेहनत वाया जाते. - आत्राम भाई, मजूर, आंध्र प्रदेश 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manyads shrimp in the trap of Telugu laborers nashik marathi news