मराठा आरक्षण : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष नाशिकच्या राज्यव्यापी बैठकीकडे!

दत्ता जाधव
Friday, 25 September 2020

मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने समाजातील विद्यार्थी युवकांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी छञपती खा. संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

नाशिक: (पंचवटी) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने युवकांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन भरकटू नये, म्हणून उद्या  (शनिवार, ता. २६) नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद रोडवरील मधुरम हॉलमध्ये होणा-या या बैठकीत खा. संभाजीराजे भोसले मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

खासदार संभाजीराजेंच्या उपस्थिती

मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने समाजातील विद्यार्थी युवकांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी छञपती खा. संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. या राज्यस्तरीय बैठकीला समाजातील अभ्यासक, जाणकार आवर्जून उपस्थित राहणार आहेत. बैठकीत समाजाचे आंदोलन पुन्हा पुर्वीसारखे एकसंघ उभे करण्याचा निर्णय होणार आहे.

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरणार

बैठकीत ठरल्याप्रमाणेच या आंदोलनाची दिशा असेल असे संयोजकांनी कळवले आहे, या बैठकीच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा दोन दिवसापासून परिश्रम घेत आहे. औरंगाबाद रस्त्यावरील निलगिरी बाग परिसरातील मधुरम हॉल येथे सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थित राहून मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा समजून घ्यावी, असे आवाहन नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने केले असून कमीत कमी दोनशेहून अधिक समन्वयक बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha reservation movement will be planned in Nashik marathi news