esakal | ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 
sakal

बोलून बातमी शोधा

covid center 123.jpg

एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. टप्प्याटप्प्याने रुग्णांची संख्या वाढत गेली. मेअखेरपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता; परंतु जूनपासून कोरोनाची मगरमिठी घट्ट झाली. जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाचे विक्रम मोडीत निघाले. सप्टेंबरमध्ये हाहाकार झाला. तब्बल हजाराच्या पटीने सध्या रुग्ण आढळत असून, त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत.

३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अचानक कोविड रुग्णालये उभी राहत असल्याचा प्रकार समोर आला असून, दोन ते तीन महिन्यांत शहरात नव्याने ३० हून अधिक रुग्णालये रातोरात उभी राहिली आहेत. वाढत्या रुग्णांवर उपचार करण्याची गरज लक्षात घेता परवानगी दिली जात असल्याचा खुलासा वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केला. 

रुग्णांच्या उपचारासाठी परवानगी दिल्याचा प्रशासनाचा खुलासा
एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. टप्प्याटप्प्याने रुग्णांची संख्या वाढत गेली. मेअखेरपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता; परंतु जूनपासून कोरोनाची मगरमिठी घट्ट झाली. जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाचे विक्रम मोडीत निघाले. सप्टेंबरमध्ये हाहाकार झाला. तब्बल हजाराच्या पटीने सध्या रुग्ण आढळत असून, त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची कमतरता, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची सुरू असलेली आर्थिक लूट, बेड आहे तर सेवा देण्यास पुढे कोणी येण्यास तयार नाही, या समस्यांनी डोके वर काढले जात असताना नव्याने रुग्णालये तयार होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. तीन ते चार लोक एकत्र येऊन महापालिकेच्या परवानगीने शहरात बंद पडलेले किंवा निवासी भागात इमारत भाडेतत्त्वावर घेऊन रुग्णालये सुरू करत असल्याची बाब सत्यभामा गाडेकर व कमलेश बोडके यांनी समोर आणली. नव्याने तयार होत असलेली काही रुग्णालये अशी आहेत की त्यात क्लिनिकच्या सुविधा नसताना अशा रुग्णालयांना परवानगी दिलीच कशी, असा सवाल श्री. बोडके यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

सहा महिन्यांत ७३ कोविड सेंटर 
क्लिनिकच्या परवानगीसाठी महापालिकेची गरज नाही; परंतु १५ खाटांच्या पुढे रुग्णालयांना परवानगी बंधनकारक आहे. सद्यःस्थितीत शहरात ६५१ रुग्णालये असून, त्यातील ७३ रुग्णालये कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आली. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयांना नियमानुसार परवानगी दिली जात असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

संपादन - ज्योती देवरे

go to top