मराठा आरक्षण : असे ‘तारीख पे तारीख’ किती दिवस चालायचे? 

दत्ता जाधव
Wednesday, 9 December 2020

मराठा समाजातील युवकांना नोकरी व शैक्षणिक आरक्षणांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात गेला असून, पुढील सुनावणी २५ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे न्यायालयाचे असे ‘तारीख पे तारीख’ किती दिवस चालायचे, असा प्रश्‍न जिजाऊ ब्रिगेडने उपस्थित केला आहे

नाशिक : मराठा समाजातील युवकांना नोकरी व शैक्षणिक आरक्षणांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात गेला असून, पुढील सुनावणी २५ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे न्यायालयाचे असे ‘तारीख पे तारीख’ किती दिवस चालायचे, असा प्रश्‍न जिजाऊ ब्रिगेडने उपस्थित केला आहे. दुसरीकडे शासनाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेतर्फे येत्या १४ डिसेंबरला मुंबईत वाहन मोर्चा काढण्यात येणार आहे. 

मराठा आरक्षण : छावा क्रांतिवीर सेनेतर्फे १४ ला मुंबईत वाहन मोर्चा 
मराठा आरक्षणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे बुधवारी सुनावणी होणार असल्याने मोठी उत्सुकता होती. मात्र, घटनापीठाने पुढील सुनावणी २४ जानेवारीला ठेवल्याने समाजातील युवकांमधून तीव्र भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्या अनुषंगाने छावा क्रांतिवीर सेनेतर्फे १४ डिसेंबरला मुंबईत वाहन मोर्चाच्या माध्यमातून हजारो वाहनांद्वारे विधानभवनाला घेराव घातला जाणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

जिजाऊ ब्रिगेडही आक्रमक 
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तारीख पे तारीखमुळे समाजातील युवक-युवतींत नैराश्‍याची भावना आहे. न्यायालयाने केवळ तारीख पे तारीख न करता समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी व्यक्त केली. राज्यातील आघाडी सरकारनेही याबाबत निराशा केल्याचे त्यांनी सांगितले.  

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha reservation nashik marathi news