मराठी राजभाषा दिन : भाषेबद्दलची आपुलकी टिकेल की नाही ही चिंता अनाठायी...!

मराठी राजभाषा दिन.jpg
मराठी राजभाषा दिन.jpg

नाशिक : इंग्रजी माध्यमांचा मराठी भाषेवर परिणाम होणार नाही. इंग्रजी ही फक्त अध्ययनाची भाषा आहे. घरी आल्यानंतर मात्र मराठीतच बोलले जाते. भाषेशिवाय कोणताच व्यवहार होत नाही. मराठी भाषेबद्दल अनेक संमेलनातून, चर्चासत्रातून चिंता व्यक्त केली जाते. भाषा बोलणारा हा भाषेची जपणूक करत असतो. एकाच भाषेवर आयुष्य काढणारे कितीतरी लोक आहेत. भाषा ही कधीही न संपणारी गोष्ट आहे त्यामुळे मराठी भाषेविषयी व्यक्त केली जाणारी चिंता ही अनाठायी आहे, असे मत मराठीच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. 

भाषेशिवाय कुठलाच व्यवहार  नाही

महाराष्ट्रात जवळपासून 52 प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. एक समृद्ध बोलीची परंपरा महाराष्ट्राला आहे. या भाषेंचे जतन होणे आवश्‍यक आहे. आजही प्रत्येक बोलीने आपले शब्दधन जोपासले आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोलीभाषा वापरतात पण त्याला प्रमाण मराठीची जोड असते म्हणून ते एकमेकांना समजते. भाषा बोलणारा प्रत्येकजण ती जपत असतो. शाळा महाविद्यालय, संशोधन, बोलीभाषांचे अभ्यास ते प्रमाण भाषेला पूरक असतात. जो तो आपापल्या परीने भाषेच्या संवर्धनासाठी अखंड प्रयत्न करत असतो. भाषेशिवाय कुठलाच व्यवहार होत नाही. व्यापार, प्रशासन, संशोधनात भाषेचा व्यवहार सुरू असतो.

भाषेबद्दलची आपुलकी टीकेल की नाही चिंता ही अनाठायी 

विचारांचे आदानप्रदान अखडपणे चालू असते. आणि प्रत्येकजण त्या त्या परीने भाषा वापरतो. आपल्या नकळत भाषेची स्पंदनं सारखी सुरू असतात. भाषेविषयी अकारण चिंता आहे. क्षेत्र वाढत आहे. या नवीन क्षेत्रातही भाषेची कसोटी लागते आणि ती त्या कसोटीला उतरत असते. भाषाबद्दलची आपुलकी टीकेल की नाही चिंता ही अनाठायी आहे. इंग्रजी माध्यमे आली तरी जास्त मोठ्या प्रमाणावर मराठी बोलणारे आहेत. त्यांच्या जोरावर भाषा टिकणारच आहे. त्यामुळे भाषेच्या ऱ्हासाविषयी जी चिंता केली जाते, ही अनाठायी आहे. एका भाषेत आयुष्य काढणारी कितीतरी लोक आहे. पण त्यांचे आयुष्य मर्यादित राहते. पण दुसरी भाषा त्यांना मिळाली तर स्वतःची भाषा पण समृद्ध होते. 

मराठी भाषेच्या ऱ्हासाविषयी जी चिंता केली जाते ती अनाठायी आहे. कारण कुठलाच व्यवहार हा भाषेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भाषा बोलणारा प्रत्येक जण हा भाषा जपतच असतो. शाळा महाविद्यालयांमधून सुरू असलेले शिक्षण, वेगवेगळ्या पातळ्यावर सुरू असलेले संशोधन, बोलीभाषांचे अभ्यास, शब्दकोश यातून भाषेचे अखंड संवर्धन होतच असते. भाषेची स्पंदनं सतत सुरूच राहतात. - डॉ. दिलीप धोंडगे, अध्यक्ष, मराठी भाषा सल्लागार समिती

मराठी भाषा जोपासणे ही सर्व भाषिकांची जबाबदारी आहे. शेती, विज्ञान, वैद्यकीय यांचे शिक्षण इंग्रजीतून तसेच न्यायालयीन निकाल हे इंग्रजीमधून येत असतात, ते आपल्या भाषेत आले पाहिजेत. आपल्या भाषेत लोकगीते, म्हणी, वाक्‌प्रचार यांचा खूप चपखल वापर केला आहे. आपण आपल्या मातृभाषेतूनच बोलले पाहिजे, हे जर प्रत्येकाने ठरवले तर काही वेगळे करावे लागण्याची गरज नाही. - डॉ. बाळासाहेब गुंजाळ, निवृत्त मराठी विभागप्रमुख, केटीएचएम महाविद्यालय 

मराठी ही फक्त आपली मातृभाषा नाही तर ती राज्यभाषा आहे. मराठी भाषा जर सक्तीची केली पाहिजे. मराठी साहित्य हे इतर भाषेत पोहोचले पाहिजे. आपल्याला समृद्ध अशा 52 बोलीभाषांची परंपरा आहे. भाषेचे महत्त्व तिचा वापर कसा होतो यावर अवलंबून आहे. सर्वत्र तिचा दरवळ पाहिजे. भाषेचा विनियोग केला गेला पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. - प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, लेखिका  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com