दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; दहा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ झाल्याची घटना घडली. विवाहितेला मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या सासरकडील दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 

नाशिक : (मालेगाव) दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ झाल्याची घटना घडली. विवाहितेला मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या सासरकडील दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 

असा आहे प्रकार

घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून शफीउन्निसा मोहंमद शाहीद (वय २५, रा. हलिमा शफाअत मशिदीजवळ) या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरकडील दहा जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती मोहंमद शाहीद, जेठ खालीद मोहंमद, जेठाणी सायेरा खालीद, दीर रशीद मोहंमद, दिराणी अल्फिया, दीर अकलाक मोहंमद, मोबीन मोहंमद, जाहीद मोहंमद, नणंद फौजिया मोहंमद व सादिया मोहंमद (सर्व रा. तय्यबा बाद, मालेगाव) यांनी विवाहितेचा छळ केला. १० मार्च २०१७ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयितांना अद्याप अटक झालेली नाही. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा 

येथील माहेरवाशीन असलेल्या सुची सिद्धार्थ शर्मा (वय ३१) या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तिचा पती सिद्धार्थ सुनील शर्मा याच्यासह पाच जणांविरुद्ध (सर्व रा. औरंगाबाद रोड, नगर) येथील कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विवाहिता सासरी नांदत असताना तिला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ व मारहाण होत होती. ठार मारण्याची धमकी देऊन सासरकडील लोकांनी मुलीसह तिला घराबाहेर हाकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marital harassment for Rs 2 lakh, charges filed against ten persons nashik marathi news