सोशल मिडियावरील मैत्री, लग्न आणि आयुष्याचा खेळखंडोबा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

 सोशल मिडियावरून आपण संपूर्ण जगासोबत जोडले जातो. याच सोशल मिडियाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही तितकेच आहेत. आजकाल सोशल मिडियावरून अनेक जण मैत्री करतात, ओळख निर्माण करतात. तर काहीजण लग्नाचा निर्णयही घेतात. अश्याच पध्दतीने लग्न झालेल्या मुलाला अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागतोय. ज्यामुळे त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.  

फेसबुकवर मैत्री अन् खिशाला कात्री

नाशिक : सोशल मिडियावरून आपण संपूर्ण जगासोबत जोडले जातो. याच सोशल मिडियाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही तितकेच आहेत. आजकाल सोशल मिडियावरून अनेक जण मैत्री करतात, ओळख निर्माण करतात. तर काहीजण लग्नाचा निर्णयही घेतात. अश्याच पध्दतीने लग्न झालेल्या मुलाला अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागतोय. ज्यामुळे त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.  

सोशल मिडियाची मैत्री...खिशाला कात्री

सातपूर भागात राहणाऱ्या नायर कुटुंबातील तरुणाचे कोट्टापुरम (ता. कोल्लम) येथील तरुणीशी फेसबुकवर मैत्री झाली. यानंतर मैत्री आणि पुढे प्रेमसंबधही जुळल्याने या भेटीचे रुपांतर थेट लग्नात झाले. आयकर विभागात कार्यरत असल्याचे सांगत मुलीने गावाकडेच २०१६ मध्ये विवाह उरकला. तसेच नवऱ्याला सिंगापूर येथे नोकरी लावून देते असे सांगून नायर परिवाराकडून १७ लाख रुपये उकळले. शंका आल्याने संबंधित मुलीचा सखोल तपास केला असता ती कुठल्याही शासकीय कार्यालयात नसल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे पैशांसाठी तगादा लावताच तिने संबंधित तरुणाकडे फारकतीची मागणी केली आहे. चार वर्षांहून अधिक काळ उटल्याने तरुणाच्या वडिलांनी सातपूर पोलिस स्टेशन गाठत आपले ग्राऱ्हाणे मांडले आहे.

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

१७ लाख उकळून फारकतीची मागणी

सोशल मीडियाचे व्यसन लागले की आयुष्याचा कसा खेळखंडोबा होतो, याचा अनुभव सातपूर परिसरातील तरुणाला आला आहे. फेसबुकवर मैत्री झालेल्या मुलीशी विवाह केल्यानंतर चार वर्षांत संबंधित मुलीने मुलाच्या परिवाराकडून १७ लाख उकळून आता फारकतीची मागणी केली आहे. त्यामुळे तरुणाच्या वडिलांनी आता सातपूर पोलिसांत धाव घेतली आहे.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage from social media nashik marathi news