नवऱ्याच्या जाचाला कंटाळून चंदाचा अखेरचा निर्णय; लेकरांचा जीवघेणा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

होता सोन्याचा संसार...राजा राणीचा दरबार. पदरात दोन सोन्यासारखी लेकरं. कोणताही मागचा पुढचा विचार न करता विवाहीतेने जीवन संपविले. अन् नंतर चौकशीत आली धक्कादायक माहिती. त्यानंतर सगळे चित्रच पालटले. वाचा नेमके काय घडले? 

नाशिक : (सटाणा) होता सोन्याचा संसार...राजा राणीचा दरबार. पदरात दोन सोन्यासारखी लेकरं. कोणताही मागचा पुढचा विचार न करता विवाहीतेने जीवन संपविले. अन् नंतर चौकशीत आली धक्कादायक माहिती. त्यानंतर सगळे चित्रच पालटले. वाचा नेमके काय घडले? 

अशी आहे घटना

बिरदावनपाडा (मानूर) येथील साहेबराव पंडित गांगुर्डे याचा विवाह हतनूर येथील वसंत गवळी यांची मुलगी चंदा हिच्याशी झाला होता. चंदाला रवींद्र आणि गायत्री असे दोन मुलेही आहेत. मात्र साहेबराव जुगार खेळण्यासाठी व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी करत करत होता. चंदाने त्याची मागणी पूर्ण न केल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. साहेबरावच्या जाचाला कंटाळून २६ सप्टेंबर २०१५ रोजी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्महत्या केली. याप्रकरणी सटाणा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी गुन्हे साहेबराव गांगुर्डे विरुद्ध दाखल करण्यात आले. सबळ पुराव्यांमुळे मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी या खटल्याचा निकाल घोषित केला. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी आरोपीला हुंडाबळी प्रकरणी ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० महिने शिक्षा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याने ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा २५ हजार रुपये दंड व दंड भरल्यानंतर मुलांच्या नावे ५० हजारांची मुदत ठेव, अशी शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचा >  सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married woman commits suicide in Satna, Filed against husband nashik marathi news