संतापजनक! "माहेरच्यांकडून लग्नात मानपान नाही"..सासरच्यांकडून सतत होणाऱ्या छळामुळे विवाहितेची विहिरीत उडी

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 4 July 2020

माहेरच्या लोकांनी लग्नात चांगला मानपान दिला नाही, मुलगा झाला नाही या कारणावरुन सासरच्यांकडून वारंवार शारिरीक व मानसिक छळ व्हायचा विवाहितेचा...ती निमुटपणे सहन करत होती..पण एके दिवशी असह्य झाले...आणि मग...

नाशिक / वणी : माहेरच्या लोकांनी लग्नात चांगला मानपान दिला नाही, मुलगा झाला नाही या कारणावरुन सासरच्यांकडून वारंवार शारिरीक व मानसिक छळ व्हायचा विवाहितेचा...ती निमुटपणे सहन करत होती..पण एके दिवशी असह्य झाले...आणि मग...

असा घडला प्रकार...

मुलगी सोनालीचा विवाह मे २०१५ रोजी झाला होता. तेव्हापासून सोनालीचा सासरा हिरामन किसन सोनवणे, सासु सुशिलाबाई हिरामन सोनवणे, भाया संतोष हिरामन सोनवणे, जाऊ योगिता संतोष सोनवणे अशांनी तिस वारंवार क्षुल्लक कारणावरुन कुरापत काढुन तसेच तिचे अंगावर अधिकचे काम टाकुन तिला स्वयंपाक येत नाही, तिची संस्कृती नाही, तिचे माहेरचे लोकांनी लग्नात चांगला मानपान दिला नाही, मुलगा झाला नाही या कारणावरुन तिचा वारंवार शारिरीक व मानसिक छळ करुन तिला जीवन जगणे असह्य केले होते. यातूनच सोनालीने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत वणी पोलिसांत सोनालीचे सासु, सासरे, दिर व जाऊ या चौघांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, पोलिस हवालदार साहेबराव वडजे, किरण धुळे करीत आहे. सोनालीच साडेचार वर्षाची मुलगी आहे.

हेही वाचा > भयंकर..आमरस खाण्यासाठी नाशिकच्या पाहुण्यांना खास निमंत्रण..अन् तिथेच झाला घात..! गावात दहशत..

चौघा विरुध्द गुन्हा दाखल

माहेरच्या लोकांनी लग्नात चांगला मानपान दिला नाही, मुलगा झाला नाही या कारणावरुन वारंवार शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून मुलीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची फिर्याद पोलिसांत दिल्याने चौघा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मातेरेवाडी, ता. दिंडोरी येथील सोनाली गणेश सोनवणे, (वय २८) रा. मातेरेवाडी हीचा मातेरवाडी शिवारातील शेतातील विहीरीत बुधवारी,(ता. १) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विहीरीत पडून मृत्यु झाला होता. याबाबत वणी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. दरम्यान मुलीचे वडील नामदेव बाबुराव मोरे, (वय 57) वर्षे, रा. जालखेड, ता. दिंडोरी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >  सोसायटीचे कर्ज..लहान बहिणीचे लग्न..लहान वयातच जबाबदारीचं ओझं..एका भावाची नशिबाशी झुंज अपयशी..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman Suicide by jumping into the well nashik marathi news