esakal | ह्रदयद्रावक घटना.. "तू काळी आहेस, तुला काहीच येत नाही' विवाहितेच्या चिठ्ठीत धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

varsha ahire 1.png

वर्षाच्या सासरकडील लोकांनी "तू काळी आहेस, तुला स्वयंपाक बनवता येत नाही' अशा विविध कारणांनी मानसिक छळ केला. घर बांधण्यासाठी माहेरून पैशांची मागणी केली जात होती

ह्रदयद्रावक घटना.. "तू काळी आहेस, तुला काहीच येत नाही' विवाहितेच्या चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : वर्षाच्या सासरकडील लोकांनी "तू काळी आहेस, तुला स्वयंपाक बनवता येत नाही' अशा विविध कारणांनी मानसिक छळ केला. घर बांधण्यासाठी माहेरून पैशांची मागणी केली जात होती.

विवाहितेच्या चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

पाटीलनगर येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्यांविरोधात अंबड पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षा सचिन अहिरे (वय 24, रा. पाटीलनगर, सिडको) या विवाहितेने गुरुवारी 
(ता. 25) घरी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेला त्रिमूर्ती चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार

या वेळी तिच्याजवळ चिठ्ठी सापडली.

महिलेचा भाऊ कमलेश जाधव याच्या फिर्यादीनुसार, वर्षाच्या सासरकडील लोकांनी "तू काळी आहेस, तुला स्वयंपाक बनवता येत नाही' अशा विविध कारणांनी मानसिक छळ केला. घर बांधण्यासाठी माहेरून पैशांची मागणी केली जात होती. या प्रकारामुळे वर्षाने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिलेचा घातपात करण्यात आल्याचा संशय तिच्या नातेवाइकांनी व्यक्त करत गुरुवारी रुग्णालयात गोंधळ घातला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत अंत्यविधीनंतर चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन नातेवाइकांना देत गुन्हा दाखल केला.

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​