विवाहितेची विहीरीत उडी ..तासाभरातच कुटुंबियांच्या लक्षात आला 'हा' प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

सकाळी नऊच्या सुमारास पानसवाडी शिवारातील विहिरीत काहीतरी घडल्याची कुजबूज सुरू झाली. सौंदाणेची विवाहिता विहीरीकडे गेल्याचा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला अन् मग...

नाशिक / मालेगाव : सकाळी नऊच्या सुमारास पानसवाडी शिवारातील विहिरीत काहीतरी घडल्याची कुजबूज सुरू झाली. सौंदाणेची विवाहिता विहीरीकडे गेल्याचा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला अन् मग...

काय घडले नेमके?

सौंदाणे येथील सारिका संतोष पवार (30, रा. सौंदाणे शिवार) या विवाहितेने गुरुवारी (ता.16) सकाळी नऊच्या सुमारास पानसवाडी शिवारातील स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तासाभरातच कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. परिसरातील ग्रामस्थांनी विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न केले. विहिरीत 25 फुटापेक्षा जास्त पाणी असल्याने त्यांना यश आले नाही. त्यामुळे महापालिका अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशामक दलाचा जवान शकील अहमद याने निवृत्ती बोराळे, विकास थोरात, आबीद खान या जवानांच्या मदतीने तासाभरात शोध घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढला.

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?

आकस्मिक मृत्युची नोंद

तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सारिका पवार यांच्या पश्‍चात पती, दोन मुले, सासु-सासरे असा परिवार आहे. आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकले नाही.

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman suicide at saundane nashik marathi news