भक्तांची काळजी..अन् कोरोनाचे संकट बघता राधा-कृष्णालाही मास्क!

सागर आहेर
Wednesday, 12 August 2020

नाशिक येथील मुरलीधर मंदिर व चांदोरी (ता.निफाड) येथील सरदार हिंगणे यांचा कृष्ण जन्माची परंपरा समान आहे. नाशिक येथील मुरलीधर मंदिरातील कृष्णाची मूर्ती ही मूळची चांदोरी येथील सरदार हिंगणे यांची असून ती नाशिक येथे नेल्याने सर्वश्रुत आहे.त्या नंतर हिंगणे यांनी त्या मूर्तीसारखीच मूर्ती जयपूर राज्यस्थान येथून बनवून आणल्या नंतर प्रतिष्ठापना केली.

नाशिक / चांदोरी : देव भक्तांना सर्व संकटातून वाचवतो, अशी भक्तांची श्रद्धा असते. तरीही माणसाला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींचा देवाला त्रास होतो या काळजीच्या भावनेतून भक्त देवाच्या मूर्तींची काळजी घेतात.उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदन लावतात तर हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून ब्लँकेट पांघरवतात. तसेच काहीसे चांदोरी या गावात केले गेले. जगावर असलेल्या कोरोनाचे संकट बघता राधा कृष्णाच्या मूर्तीला मास्क लावण्यात आला होता.

चांदोरी येथील राधा कृष्णास मास्क

नाशिक येथील मुरलीधर मंदिर व चांदोरी (ता.निफाड) येथील सरदार हिंगणे यांचा कृष्ण जन्माची परंपरा समान आहे. नाशिक येथील मुरलीधर मंदिरातील कृष्णाची मूर्ती ही मूळची चांदोरी येथील सरदार हिंगणे यांची असून ती नाशिक येथे नेल्याने सर्वश्रुत आहे.त्या नंतर हिंगणे यांनी त्या मूर्तीसारखीच मूर्ती जयपूर राज्यस्थान येथून बनवून आणल्या नंतर प्रतिष्ठापना केली.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

कृष्णजन्म मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार

कृष्ण जन्माष्टमी निमित्त वर्षानुवर्षे विविध कार्यक्रम पार पडले जात होते,या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रमास खंड पडला तरी कृष्णजन्म मोजक्या व्यक्तींच्या उपस्थिती मध्ये मंगळवार (ता.११) रोजी पार पडला

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

संपादन - ज्योती देवरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mask to Radha Krishna in Chandori nashik marathi news