'कुंभकर्ण झोपेतून आज जागा झाला'...महापौरांचा शिवसेनेला टोला

mayors.jpg
mayors.jpg

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टिका करणाऱ्या शिवसेनेवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी संतप्त होऊन निशाणा साधला. रस्त्यावर या...राजकारण करण्यापेक्षा शासनाकडून निधी आणा असा सल्ला देताना कोरोनाच्या बिकट परिस्थितीत कुंभकर्ण आज झोपेतून जागे झाल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांना लगावला...

बोरस्तेंच्या टिकेला महापौरांचे प्रत्युत्तर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी टिका केली होती. त्या टिकेला आज महापौरांनी प्रत्युत्तर दिले. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सातत्याने केंद्र व राज्य शासनाच्या संपर्कात आहे. घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना उपाययोजना व सुचना दिल्या, मुंबई व मालेगाव मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहराच्या हद्दीवर राखीव सुरक्षा दलाची मागणी केली. कोरोना चाचण्यांसाठी मॉलिक्‍युलर लॅब मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. खासगी रुग्णालयांकडून आर्थिक लुट होत असल्याने त्यावर अंकुश ठेवण्याच्या सुचना केल्या. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ गरजुंना मिळावा म्हणून लेखी पत्रव्यवहार केला. लॉकडाऊन काळात गरीबांना अन्नधान्य वाटले.

खमंग प्रसिद्धीसाठी राजकारण न करण्याचा सल्ला

झोपडपट्टी व गावठाण भागात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटल्या. पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये कोरोना उपचारासाठी आर्थिक तरतुद करताना तातडीने औषधे खरेदीच्या सुचना दिल्या. कोरोना काळात आम्ही रस्त्यावर आहोत फार्म हाऊसवर नव्हे. नाशिककरांना आम्ही काय काम करतं आहोत याची पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे खमंग प्रसिद्धीसाठी राजकारण न करण्याचा सल्ला देताना कोरोनाचा मुकाबला सांघिक पध्दतीने करण्याचे आवाहन केले.

राज्य सरकारवर निशाणा

राज्य सरकारकडे दुरदृष्टी असती तर औषधांचा तुटवडा जाणवला नसता. औषधांचा काळा बाजार होत असून त्याला जबाबदार कोण? असा सवाल महापौर कुलकर्णी यांनी केला. भाजपकडून सातत्याने लॉकडाऊनची मागणी होत असताना ते का केले जात नाही. लॉकडाऊन न करण्यामागे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप करताना झोपेचं सोंग घेतलेल्या विरोधी पक्षांनी कठीणप्रसंगी राजकारण न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. आतापर्यंत फक्त वीस लाख रुपये शासनाकडून आलेत. शिवसेनेने भाजपवर टिका करताना राज्य शासनाकडे जाऊन निधी का मागितला नाही? असा सवाल करताना महापौर कुलकर्णी यांनी महामारीच्या परिस्थितीमध्ये सहकार्य करण्याऐवजी विरोधी पक्षाकडून होणारी टिक्का टिप्पणी खेदजनक असल्याचे सांगितले.

मनसेला च्यवनप्राशची गरज

मनसेच्या उपहासात्मक च्यवनप्राश आंदोलनाची महापौर कुलकर्णी यांनी खिल्ली उडविली. अस्तित्व टिकविण्यासाठी आता मनसेलाच च्यवनप्राशची गरज असल्याचे ते म्हणाले. मनसैनिकांनी त्यांच्या टूंबियांना च्यवनप्राश दिले तरी ते सुरक्षीत राहतील असा खोचक सल्ला दिला. मनसे कार्यकर्त्यांनी रामायण बाहेर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राश चांगले असल्याचे सांगितले व बाहेर आंदोलनाचा टाहोपिटल्याने ते आंदोलन नव्हतेचं असा खुलासा त्यांनी केला.

खमंग लोकप्रियतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर चुकीचे आरोप करण्यापेक्षा विरोधी पक्षाने नागरिकांना दिलासा द्यावा, संकट काळात आपण कुठे आहात? शहर कोरोनामुक्त करण्यासाठी जे-जे करता येईल ते सर्व प्रयत्न महापौर म्हणून करू. - सतीश कुलकर्णी, महापौर


कुंभकर्ण कोण हे जनताच ठरवेल : बोरस्ते 

रामायण ते राजीव गांधी भवन या काही मिनिटांच्या अंतरात कोरोना टेस्टिंग उपकरण घेण्याचा दोन कोटीचा ठराव पोचायला सतरा दिवस उजाडले. यावरून आपले गांभीर्य आणि तत्परता नाशिककरांना समजली आहे. व्हेंटिलेटरअभावी मृत्युमुखी पडणारे रुग्ण, खासगी रुग्णालयात सामान्यांची होणारी लूट, इंजेक्शनचा होणारा काळाबाजार नाशिककर बघत आहेत आणि सोसतही आहेत. म्हणून कुंभकर्ण कोण हे जनताच ठरवेल, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांच्या टीकेला दिले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com