पॉवर टीलरने 'त्यांचे' काम झाले सोपे?...वाचा कसा होतोय यांत्रिकीकरणाचा फायदा

palsan
palsan

नाशिक/पळसन : जिल्ह्यातील आदिवासी तालुका असलेल्या सुरगाण्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी काळाप्रमाणे बदलत पारंपारिक पद्धतीने शेती न करता कृषी विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेत आधुनिक यंत्राच्या साह्याने शेती करण्यास सुरूवात करत बदल घडवित आहे. कसे ते वाचा सविस्तर...

श्रम, पैसा आणि वेळेची बचत

तालुक्‍यातील अतिदुर्गम भाग असलेल्या पिंपळसोंड येतील भात उत्पादक शेतकरी शिवराम चौधरी यांनी भाताच्या खाचरात पॉवर टीलरच्या साह्याने चिखल करत कामामध्ये आधुनिकता आणली आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रगतीकरीता कृषी विभागातर्फे अनेक योजना आमंलात आणल्या जात आहे. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये आता आदिवासी शेतकरी पारंपारीक पद्धतीने शेती न करता कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घेवू लागला आहे.
सुरगाणा तालुक्‍यातील आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे भात शेती. भाताच्या पुनर्लागवडीकरिता चिखलणीसाठी बैलजोडी किंवा रेड्यांच्या मार्फेत दिवसभर भाताच्या खाचरात चिखल तुडविला जात होता. यामुळे शेतकऱ्याचा वेळ, पैसा जास्त खर्च होत असे.

आधुनिकीकरणाकडे वाटचाल

कृषी विभागा तालुका कृषी अधिकारी अशोक ढमाले, मंडल अधिकारी जयराम आढळ, कृषी सहाय्यक एच.आर.गावित, गुलाब भोये यांनी भात लागवड यंत्र, भात कापणी यंत्र, मळणी यंत्र, चिखलणी करण्यासाठी पॉवर टिलर कशा प्रकारे अधिक चांगले आहे तसेच यामुळे होणारे फायदे याचे महत्व येथील आदिवासी शेतकऱ्यांमध्ये पटवून देत बदलाकडे वळण्याचे आवाहन केले. त्यानंतर पिंपळसोंड येथील भात उत्पादक शेतकरी शिवराम चौधरी यांनी या योजनेचा फायदा घेत पॉवर टीलरच्या साह्याने भातशेती करण्यास सुरूवात केली. त्यामुळे आज तालुक्‍यातील अनेक शेतकरी आता आधुनिकीकरणाकडे वळत आहे.

मला शासनाच्याच कृषी विभागाकडून भात लावणी करीता पावर टिलरचे खरेदीकरीता अनुदान मिळाले. त्यामुळे माझ्यासह जनावरांचे श्रम कमी होवून वेळ, पैसा बचत होत आहे. ट्रॅक्‍टरपेक्षाही यास कमी इंधन लागत असून यातून चिखल भात चांगला होत आहे. - शिवराम चौधरी (भात उत्पादक, पिंपळसोंड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com