सावधान! लोकांकडून पैसे लुटण्याचा 'जामतारा फंडा' पुन्हा एकदा चर्चेत...नेमका प्रकार काय?

प्रमोद सावंत
Thursday, 13 August 2020

झारखंडमधील जामतारा येथील तरुणाई याच पद्धतीच्या फसवणुकीत तरबेज आहेत. त्यावर जामतारा नावाची वेबसिरीजही प्रदर्शित झाली आहे. हाच फंडा वापरून ही मंडळी अनेकांकडून पैसे लुटत आहेत. नेमका प्रकार काय?

नाशिक / मालेगाव : झारखंडमधील जामतारा येथील तरुणाई याच पद्धतीच्या फसवणुकीत तरबेज आहेत. त्यावर जामतारा नावाची वेबसिरीजही प्रदर्शित झाली आहे. हाच फंडा वापरून ही मंडळी अनेकांकडून पैसे लुटत आहेत. नेमका प्रकार काय?

जामतारा फंडा आहे तरी काय?

झारखंडमधील जामतारा येथील तरुणाई याच पद्धतीच्या फसवणुकीत तरबेज आहेत. त्यावर जामतारा नावाची वेबसिरीजही प्रदर्शित झाली आहे. श्री. घोष यांना ते सटाणा रोड येथील वॉलफोर्ट गार्डन येथील घरी असताना रविवारी (ता. ९) दुपारी एक ते पावणेदोनच्या दरम्यान सिमकार्डवरून (९१९५९३४८०७५२) मोबाईलधारकाने फोन केला. तुमचा जिओ सिमकार्ड नंबर (७०२०६६६०८६) बंद होणार आहे. तुम्ही केवायसी आपल्या अकाउंटला सबमिट करा, असे बोलत जिओ ॲपला १० रुपये टाकून केवायसी भरून घ्या, अशी माहिती देत त्यांना बोलण्यात व्यस्त ठेवून त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या सानपाडा नवी मुंबईच्या खात्यातून (क्रमांक ५०१००१०४१०५२०१) दोन वेळा प्रत्येकी अडीच लाख रुपयांची नेटबँकिंगद्वारे पाच लाख रुपये फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घोष यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ११) गुन्हा दाखल झाला आहे.  

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

पाच लाख रुपये क्षणात लंपास

शहरातील वॉलफोर्ट गार्डनमधील व्यापारी सुधीरचंद्र घोष (वय ५९) यांना ‘तुमचा जिओ मोबाईल क्रमांक बंद होणार आहे. यासाठी केवायसी आपल्या अकाउंटला सबमिट करा,’ असे बोलण्यात गुंतवून त्यांच्या नवी मुंबईच्या सानपाडा एचडीएफसी बँकेच्या शाखेतून पाच लाख रुपये क्षणात लंपास करण्यात आले. येथील व्यापाऱ्याच्या या फसवणुकीचा जामतारा फंडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: merchant Fraud by Jamtara Funda nashik crime marathi news