esakal | कामगार दिवाळीचा आनंद उपभोगतानाच आली बातमी; कंपनीने पाठविली नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

ambad workers 1.jpg

एकीकडे कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपल्या परिवारासह दिवाळी सणांचा आनंद घेत असतांना, दुसरीकडे कंपनी व्यवस्थापनाने कोरोना काळात कामगारांना व्हाट्सअप वर मेसेज पाठवला आहे. हा प्रकार ऐनवेळी उघडकीस आल्याने कामगारांना धक्का बसला आहे.

कामगार दिवाळीचा आनंद उपभोगतानाच आली बातमी; कंपनीने पाठविली नोटीस

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : एकीकडे कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपल्या परिवारासह दिवाळी सणांचा आनंद घेत असतांना, दुसरीकडे कंपनी व्यवस्थापनाने कोरोना काळात कामगारांना व्हाट्सअप वर मेसेज पाठवला आहे. हा प्रकार ऐनवेळी उघडकीस आल्याने कामगारांना धक्का बसला आहे,

ऐनवेळी प्रकार उघडकीस आल्याने कामगारांना धक्का

एकीकडे कामगार दिवाळीच्या सुट्टीत असतानाच दुसरीकडे कंपनी व्यवस्थापनाने कोरोना काळात कंपनी दिवाळखोरीत गेल्याचे कारण देत कामगारांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवत कंपनी बंद करत असल्याचे सांगत कंपनी बंद केल्याचा प्रकार ऐनवेळी उघडकीस आला. यामुळेने कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडल्याचे दिसून आले आहे. नाशिकच्या अंबड येथील अमेरिकन बहुराष्ट्रीय मालकी असलेली अमेजिक हॅलोग्राफिक्स इंडिया प्रायव्हेट लि. या  कंपनीचे (ता.१७) नोव्हेंबरपासून कामकाज बंद केल्याबाबतची सूचना कंपनीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

नोटिशीचा मजकूर 
मागील काही वर्षांपासून कंपनीची धंद्यातील परिस्थिती ठीक नसल्यामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालवत होती. त्यात कोविड १९ मुळे कंपनीकडे येण्याऱ्या मालाच्या मागणीमध्ये तीव्र घट झाल्याने कंपनीचे कामकाज सुरु ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. परिस्थितीत सुधारणा व्हावी याकरिता कंपनीने बरेच प्रयत्न केले. मात्र मागणी नसल्याने सुधारणा होण्याचे चिन्ह नाही व भविष्यात देखील कोणतीही शक्यता दिसत नाही. बाजार पेठेतील मागणी व इतर कारणे बघता कंपनीचे कामकाज भविष्यात सुरु ठेवणे कठीण झाले असून आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे ता.१७ नोव्हेंबर २०२० पासून कंपनीने त्यांचे कामकाज कायम स्वरूपी व पूर्णपणे बंद करण्याचे ठरविले आहे . सदर सूचना व्हाटसअपवर देखील पाठविण्यात आली आहे. तसेच या नोटीशीची एक प्रत रजी. पोस्टाने देखील पाठवण्यात येत आहे. कंपनी बंद झाल्याने कामगारांना कायद्यानुसार देय एक महिन्याचा च्या नोटीसी ऐवजी एक महिन्याचा पगार व निघत असलेली नुकसान भरपाईची रकम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान