Lockdown4 : लॉकडाउनमध्ये मनरेगाची ग्रामीण जनतेला साथ; 'इतक्या' मजूरांच्या हाताला मिळाले काम!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे हातचे काम गेले...कमवणारं कसं अन् खाणार काय? अशातच रोजगार हमीच्या कामावर विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून इतक्या मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे हातचे काम गेले...कमवणारं कसं अन् खाणार काय? अशातच रोजगार हमीच्या कामावर विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून इतक्या मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फिजिकल डिस्टन्सह अन्य नियमांचे पालन करीत मजूर काम करीत आहेत.

सोशल डिस्टन्सिंगसह मास्क घालून कामे

मनरेगा अंतर्गत शेल्फवर ९८ हजार ८५१ कामे ठेवण्यात आली असून 1 लाखापेखा अधिक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. विभागातील एकूण ५०७७ पैकी २६०३ ग्रामपंचायती मध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १०३१०, धुळे ११०८०, जळगाव ५४४१, नाशिक २०३४४ आणि नंदुरबार जिल्ह्यात २८८०० मजूर कामावर आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून ७५ हजार ९९७ मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. विभागीय आयुक्त राजारामा माने उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात जलसंधारण व गाळ काढण्याची अधिकाधिक कामे हाती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सीसीटी, वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकूल, मजगी, सलग समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटीका, फळबाग लागवड, वनीकरण अशी विविध कामे या योजनेअंतर्गत घेतली जात असल्याने गावालादेखील याचा फायदा होत आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा

विशेषत: अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढून गावाला याचा उपयोग होणार आहे. सुरू झालेल्या कामांमध्ये वैयक्तिक स्वरुपाची ११९७४ कामे सुरू असून ४९ हजारावर मजूर कामावर आहेत. तर सार्वजनिक स्वरुपाची ११७७ कामे सुरू असून तेथे सुमारे २७ हजार मजूर कामावर आहेत.

हेही वाचा > रात्रीची वेळ...दोन बारकी लेकरं घेऊन 'त्या' जोडप्याचा पुणे ते येवला प्रवास...अन् अचानक समोर गाडी थांबते तेव्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MGNREGA has provided employment to 75,000 workers nashik marathi news