एमएचटी-सीईटी परीक्षेला उद्यापासून सुरुवात; ४ लाख ५१ हजार ९०६ विद्यार्थी प्रविष्ठ

अरुण मलाणी
Wednesday, 30 September 2020

यंदा भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) आणि भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) असे दोन्‍ही ग्रुपची स्‍वतंत्र परीक्षा होणार आहे. ९ ऑक्‍टोबरपर्यंत पीसीबी ग्रुपची परीक्षा पार पडेल. तर १२ ते २० ऑक्‍टोबर दरम्‍यान पीसीबी या ग्रुपची सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी.एस्सी (कृषी) अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक एमएचटी-सीईटी परीक्षेला उद्या (ता. १) पासुन सुरुवात होते आहे. राज्‍यभरात होणाऱ्या या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ४ लाख ३५ हजार ६५३ विद्यार्थ्यांसह देशभरातून एकूण ४ लाख ५१ हजार ९०६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. पहिल्‍या टप्‍प्यात भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) या ग्रुपची परीक्षा होईल. 

९ ऑक्‍टोबरपर्यंत पीसीबी ग्रुपची परीक्षा

कोरोनाच्‍या पार्श्वभुमीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्‍ह्‍यातून २२ हजार ६०७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. अन्‍य विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश परीक्षांप्रमाणे एमएचटी-सीईटी परीक्षादेखील प्रभावित झाली होती. इयत्ता बारावीचे निकाल जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष या सीईटी परीक्षेकडे लागून होते. सीईटी सेलमार्फत जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार उद्या (ता.१) पासून सीईटी परीक्षेला सुरवात होते आहे. गतवर्षी झालेला पर्सेंटाइलचा घोळ लक्षात घेता, यंदा भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) आणि भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) असे दोन्‍ही ग्रुपची स्‍वतंत्र परीक्षा होणार आहे. ९ ऑक्‍टोबरपर्यंत पीसीबी ग्रुपची परीक्षा पार पडेल. तर १२ ते २० ऑक्‍टोबर दरम्‍यान पीसीबी या ग्रुपची सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. 

वस्‍तूनिष्ठ बहुपर्यायी स्‍वरूपाचे प्रश्‍न

या परीक्षेत वस्‍तूनिष्ठ बहुपर्यायी स्‍वरूपाचे प्रश्‍न विचारले जाणार आहेत. कॅप्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट (सीबीटी) ही ऑनलाइन पद्धतीने होणारी परीक्षा असून, संगणक कक्षांतून विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, परीक्षा केंद्रांवर विविध उपाययोजना केल्‍या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्‍कचा वापर बंधनकारक असेल, तसेच सॅनिटायझरसह अन्‍य विविध उपाययोजना केल्‍या जाणार आहेत. 

हेही वाचा > मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

असे आहे ग्रुपनिहाय परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थ्यांची संख्या 

महाराष्ट्र नाशिक जिल्‍हा 
पीसीबी पीसीएम दोन्‍ही ग्रुप पीसीबी पीसीएम दोन्‍ही ग्रुप 
१,९३,०९९ १,५२,४३० ९०,१२४ ७,९७२ ६,८२२ ७,८१३ 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHT-CET exam starting from 1 october nashik marathi news