एमएचटी-सीईटी परीक्षा १ ऑक्टोबरपासून; प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्‍ध 

अरुण मलाणी
Sunday, 27 September 2020

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. परंतु राष्ट्रीय स्‍तरावर जेईई मेन्‍स आणि नीट सारख्या परीक्षा घेतल्‍या गेल्‍यानंतर आता राज्‍यस्‍तरावरील सीईटी परीक्षांचीदेखील लगबग सुरू झालेली आहे.

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेला गुरूवार (ता.१) पासून सुरवात होते आहे. पहिल्‍या टप्‍यात नऊ ऑक्‍टोबरपर्यंत चालणाऱ्या या ऑनलाइन स्‍वरूपातील परीक्षेच्‍या पहिल्‍या टप्‍यात भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) ग्रुपची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिलेले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. परंतु राष्ट्रीय स्‍तरावर जेईई मेन्‍स आणि नीट सारख्या परीक्षा घेतल्‍या गेल्‍यानंतर आता राज्‍यस्‍तरावरील सीईटी परीक्षांचीदेखील लगबग सुरू झालेली आहे. सर्वाधिक विद्यार्थी एमएचटी-सीईटी परीक्षेला समोरे जात असतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रम (बी.ई), औषधनिर्माणशास्‍त्र (बी.फार्म) आणि कृषी अभ्यासक्रम (बी.एस्सी.) च्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या या परीक्षेसाठी राज्‍यभरातून ४ लाख ५५ हजार ०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सीईटी सेलमार्फत जारी केलेल्‍या वेळापत्रकानुसार आता ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. 

प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध

सध्याच्‍या परीस्‍थितीत परीक्षा केंद्रांवर सुरळीत अंतर ठेवत ही परीक्षा घेतली जाणार आहे. ऑनलाइन स्‍वरूपात ही परीक्षा असल्‍याने केंद्रांवर सॅनिटायझर व अन्‍य उपाययोजना केल्‍या जाणार आहेत. दरम्‍यान पहिल्‍या टप्‍यात गुरूवार (ता.१) पासून नऊ ऑक्‍टोबरपर्यंत पीसीबी ग्रुपची परीक्षा होईल. या परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिले असल्‍याचे सीईटी सेलतर्फे जाहीर केले आहे. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

पीसीएम ग्रुपची परीक्षा १२ ऑक्‍टोबरपासून 

गेल्‍या वर्षी झालेल्‍या पर्सेंटाईलच्‍या घोळामुळे पीसीएम आणि पीसीबी अशा दोन्‍ही ग्रुपच्‍या परीक्षा स्‍वतंत्र्यरित्‍या घेतल्‍या जात आहेत. दोन्‍ही ग्रुपला सामोरे जाणार्या विद्यार्थ्यांना दोन स्‍वतंत्र अर्ज भरायचे होते. पहिल्‍या टप्‍यात पीसीबी ग्रुपची परीक्षा झाल्‍यानंतर भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची परीक्षा १२ ऑक्‍टोबरपासून सुरू होईल. २० ऑक्‍टोबरपर्यंत ही परीक्षा चालणार असून, लवकरच या ग्रुपच्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाणार असल्‍याचे सीईटी सेलतर्फे स्‍पष्ट केले आहे.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

 

संपादन - रोहित कणसे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mht-cet exam will begin from october 1 nashik marathi news