नियतीचा क्रूर डाव! कामधंदा नाही म्हणून कुटुंबासह निघाला गावी..पण कसारा घाटातच "त्याचा" काळ उभा होता..

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 11 May 2020

कामधंदाच नसल्यामुळे आपल्या गावाकडे जाण्यातच भलं अस म्हणून लाखो परप्रांतीय बांधव आपआपल्या गावाकडे जाताहेत. आपल्या जीवाची परवा न करता मिळेल त्या वाहनाचा याप्रसंगी ते वापर करीत आहे. परंतु या जीवघेण्या प्रवासात अपघाताच्या घटनाही समोर येत आहे. सोमवारी ( ता. 11 ) कसारा घाटामध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास पती-पत्नी व मुलगा हे वसईहुन उत्तर प्रदेशकडे रिक्षाने जात असताना रिक्षा दुभाजकावर आदळुन चालक जागीच ठार झाला.

नाशिक / इगतपुरी : कामधंदाच नसल्यामुळे आपल्या गावाकडे जाण्यातच भलं अस म्हणून लाखो परप्रांतीय बांधव आपआपल्या गावाकडे जाताहेत. आपल्या जीवाची परवा न करता मिळेल त्या वाहनाचा याप्रसंगी ते वापर करीत आहे. परंतु या जीवघेण्या प्रवासात असं काही घडलं की अख्ख्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अशी घडली घटना

याबाबत सविस्तर माहिती अशी, की कोरोना संसर्गामुळे मुंबईतील सर्व परप्रांतीय मजूर आपआपल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने जात आहेत. वसई येथून संध्याकाळी राजेशकुमार यादव ( वय 46 ) हे पत्नी व मुलगा या कुटुंबाला घेऊन स्वत: रिक्षा ( क्र. एम. एच. 02 डी.यु. 2264 ) चालवीत उत्तर प्रदेशकडे निघाले होते. सोमवारी ता. 11 पहाटेच्या सुमारास यादव यांची मुंबई- आग्रा महामार्गावरील कसारा घाटात रिक्षा दुभाजकावर आदळुन अपघात झाला. यात राजेशकुमार यादव हे जागीच ठार झाले. महामार्ग पोलीसांनी यादव यांना इगतपुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्याच्यावर इगतपुरीतील स्मशानगृहात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पत्नी व मुलाला पुन्हा वसईला पाठवण्यात आले.

हेही वाचा > कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

वसईहुन उत्तर प्रदेशकडे रिक्षाने जात होता

परप्रांतीय बांधव आपआपल्या गावाकडे जाताहेत. पण या दरम्यान अपघाताच्या घटनाही समोर येत आहे. सोमवारी (ता.11) कसारा घाटामध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास पती-पत्नी व मुलगा हे वसईहुन उत्तर प्रदेशकडे रिक्षाने जात असताना रिक्षा दुभाजकावर आदळुन चालक जागीच ठार झाला.

हेही वाचा > 'त्याची' एंट्री होताच...रात्री ग्रामस्थांनी चक्क फोडले फटाके..अन् मग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the migrant worker died at kasara ghat on monday nashik marathi news