'ताई ही सोन्याची पोत तुमची आहे का?'...'त्यांच्या' प्रामाणिकपणाचं सगळ्यांनाच कौतुक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

(झोडगे) दुसऱ्या दिवशी आपले धान्य लवकर दळून मिळावे यासाठी रात्रीच पिठाचा धान्यांचा डब्या गिरणीमध्ये ठेवून त्या घरी गेल्या. परंतू डब्यात ठेवलेली पोत काढायची त्या विसरल्या...अन् त्यांना जरासुद्धा कल्पना नव्हती की अशी काही चूक आपण केलीय...परंतू गिरणी मालकांचा प्रामाणिकपणा असा की स्वत:हून त्या महिलेला पोत परत केली...

नाशिक : (झोडगे) दुसऱ्या दिवशी आपले धान्य लवकर दळून मिळावे यासाठी रात्रीच पिठाचा धान्यांचा डब्या गिरणीमध्ये ठेवून त्या घरी गेल्या. परंतू डब्यात ठेवलेली पोत काढायची त्या विसरल्या...अन् त्यांना जरासुद्धा कल्पना नव्हती की अशी काही चूक आपण केलीय...परंतू गिरणी मालकांचा प्रामाणिकपणा असा की स्वत:हून त्या महिलेला पोत परत केली...

अशी आहे घटना

जळकू येथील गोरख लाठर यांच्या पिठ गिरणीवर येथील ज्योती गुरव यांनी आपले धान्य दुसरा दिवस लवकर दळून मिळावे यासाठी रात्रीच पिठाचा गिरणीमध्ये धान्यांचा डब्या ठेवून गेल्या. दुस-या दिवशी पहाटेच गिरणी मालकांनी दळणाचा डब्या गिरणीच्या सुपात टाकत असताना धान्यामध्ये दहाग्राम सोन्याचं माळ सुमारे चाळीस हजार रुपये किंमतीची दिसल्याने तात्काळ गिरण्यांच्या सुपातून काढून सदर सोन्याची माळ विजय गुरव, ज्योती गुरव या पती - पत्नीकडे सुपूर्द केली. आज नजर चुकीने धान्यांचा डब्यात ठेवलेली सोन्याची पोत रात्रीच गिरण्यीत ठेवून आल्यानं व गिरणी मालकांच्या ही बाब वेळेतच लक्षात आल्यामुळे मोठे नुकसान टळले. गोरख लाठर यांच्या प्रामाणिकपणामुळे माळमाथा परीसरात नागरिकांच्या वतीने कौतुक केले जात आहे.

हेही वाचा > "कोरोना व्हायरस''चा ऑनलाइन जगतातही संसर्ग...सावध व्हा!...कारण

देशात लॉकडाऊनमुळे सर्वच हातांना काम नसल्यामुळे अनेक व्यावसायीक व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच मुळ झोडगे येथील गुरव कुटुंब दररोज जळकु येथे घरोघरी जाऊन देवासाठी बेल टाकण्याचे काम वर्षानुवर्षे करून मिळणारा धान्य व पैसावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. गिरणी मालकांच्या ही बाब वेळेतच लक्षात आल्यामुळे मोठे नुकसान टळले.

हेही वाचा > अहो काय सांगता, स्पर्श न होता उघडणार दार?...'या' विद्यार्थ्यांनी लढविली अनोखी शक्कल

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mill owners returned the gold necklace found in the grinder nashik marathi news