गौण खनिज वाहतूकप्रकरणी सटाण्यात सहा लाखांचा दंड; महसूल विभागाची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात नवीन वर्षात सटाणा महसूल विभागाने धडक कारवाई करून लाखोंचा दंड वसूल केला. त्यामुळे बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. 

नाशिक (सटाणा) : अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात नवीन वर्षात सटाणा महसूल विभागाने धडक कारवाई करून लाखोंचा दंड वसूल केला. त्यामुळे बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. 

असा आहे प्रकार

प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नेमणूक करण्यात आली होती. बुधवारी (ता. ७) महसूल पथक गस्तीवर असताना अजमीर सौंदाणे रस्त्याला दुधमाळजवळ वनविभागाच्या गट नंबर. ७२८ मध्ये सहा ट्रॅक्टर अवैधरीत्या दगड वाहतूक करताना आढळले. ट्रॅक्टर चालककडे पथकाने चौकशी केली असता त्याच्याकडे वाहतूक परवाना नव्हता. हे दगड पारस पाटील यांच्या चौगाव शिवारातील स्टोन क्रशरवर नेण्यास सांगितल्याचे चालकाने सांगितले. पथकाने सहा ट्रॅक्टरांना सटाणा तहसीलच्या आवारात जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईत मंडळ अधिकारी भाऊसाहेब मेधने, भाऊसाहेब खरे, तलाठी मनोज भामरे, श्री. भालेराव, सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक निरीक्षक देवेंद्र शिंदे सहभागी झाले होते.  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mineral transporters fined Rs 6 lakh nashik marathi news