esakal | भुजबळ संतापले, म्हणाले...''मंदिरापेक्षा कांद्यासाठी भांडले असते तर लोकांची दुवा भेटली असती''
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan-bhujbal-1_202002368566.jpg

कुठलाही मुद्दा हाताशी घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे हे योग्य नाही. हे नेमक कुठलं हिंदुत्व म्हणताय एकीकडे गोमाता म्हणायचे आणि गोव्यात मात्र गोमांस सेवन करायचे अशी टीका छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

भुजबळ संतापले, म्हणाले...''मंदिरापेक्षा कांद्यासाठी भांडले असते तर लोकांची दुवा भेटली असती''

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (नाशिक) : 'मंदिरे उघडत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करा' अशी मागणी करून राजकारण करणाऱ्यांची कीव येते. मंदिरे खूली करण्यासाठी आंदोलनाचे इशारे देणार्‍यांनी कांद्याचे भाव पडल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान होत असल्याने कांद्याच्या भावासाठी ही आंदोलने करावीत, असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. 
मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भुजबळ यांच्या हस्ते येथील हॉटेल रेणुकाचे उद्घाटन झाले. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

मंदिरावरुन राजकारण करणे दुर्दैवीच 

कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था अडचणीतून जात असल्याने विकासाला खीळ बसली असली तरी आता सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू झाल्यानंतरच चलन फिरून राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे असे भुजबळ म्हणाले. आम्हीही देवाला मानतो, मंदिरे खुली करायचीच आहे. परंतु सध्या होणारी गर्दी आणि कोरोनाची भीती यामुळे काळजी घेतली जात आहे. परंतु त्याचेही राजकारण करणे दुर्दैवी असल्याचेही भुजबळ म्हणाले. दरम्यान, पंचायत समितीचे सदस्य मोहन शेलार यांच्या मातोश्रीचे निधन झाले आहे. यामुळे भुजबळ यांनी विखरणी येथे शेलार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.

राज्य शासनाला अडचणीत आणण्याचे कारस्थान 

ते म्हणाले की, सद्या कुठलेही मुद्दे हाताशी घेऊन राज्य शासनाला अडचणीत आणण्याचे कारस्थान केले जात आहे. केवळ राजकारणासाठी चाललंय अशी टीका त्यांनी केली. आमच्या प्रत्येक बहुजन समाजातील कुटुंबात दररोज देवपूजा केली जाते. त्यानंतरच ते घराबाहेर पडत असतात. मात्र कुठलाही मुद्दा हाताशी घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे हे योग्य नाही. हे नेमक कुठलं हिंदुत्व म्हणताय एकीकडे गोमाता म्हणायचे आणि गोव्यात मात्र गोमांस सेवन करायचे अशी टीका छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

हेही वाचा > काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, कृषी सभापती संजय बनकर, माजी सभापती संभाजी पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. संचालक राकेश गिरासे, गणेश आहेर, शंकर परदेशी आदींनी स्वागत केले.

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

go to top