esakal | अमानुष प्रकार! मालेगावात अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून अत्याचार; पोलिस चौकशीत खुलासा

बोलून बातमी शोधा

minor girl abused by three men in Malegaon Nashik Crime News

 मध्यप्रदेशातून शहरात कामाच्या शोधात आलेल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन तरुणीस  लग्नाचे अमीष दाखवून तिच्यावर तीन महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन्ही संशयितांविरोधात उजैन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

अमानुष प्रकार! मालेगावात अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून अत्याचार; पोलिस चौकशीत खुलासा
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मध्यप्रदेशातून शहरात कामाच्या शोधात आलेल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन तरुणीस  लग्नाचे अमीष दाखवून तिच्यावर तीन महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन्ही संशयितांविरोधात उजैन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

अवघ्या चार दिवसातच बाळाचा मृत्यू

धक्कादायक प्रकार म्हणजे कलाम याने या तरुणीला लग्नाचे अमीष दाखवून आत्याचार तर केलेच पण एवढ्यावरही त्याचे समाधान न झाल्याने त्याच्या दोघा मित्रांसोबतही  संबंध ठेवण्यास सांगितले.  उर्वरित दोघांनी जबरदस्तीने व दमबाजी करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही तरुणी गर्भवती राहिल्यानंतर संशयितांनी तिला बसमधून उज्जैन येथे बहिणीकडे पाठवून दिले. तेथे औषधोपचार घेतल्यानंतर तरुणीची प्रसुती झाली मात्र अवघ्या चार दिवसातच बाळाचा मृत्यू झाला. पिडीत तरुणीने या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात कलाम, खुर्शीद व माहीद (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांनी या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

संशयितांचा शोध सुरु

यानंतर पिडीत तरुणीने उज्जैन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शहराजवळील गिरणा पुलाखाली संशयित तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.  या प्रकरणी तिघा संशयितांविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार व संगनमताने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. उज्जैन पोलिस अधिक्षकांकडून नाशिक जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे याबाबतचे कागदपत्र प्राप्त झाले. त्यानंतर छावणी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ