सातवीत शिकणाऱ्या मुलीने चिठ्ठीत केला धक्कादायक खुलासा; घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले

 work 40.jpg
work 40.jpg

कुंदेवाडी (नाशिक) : "सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे.'' सातवीत शिकणाऱ्या मुलीच्या खोलीत सापडलेल्या या चिठ्ठीने कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळीकडे सुरु झाला शोधा शोध अन् नंतर...वाचा नेमके काय घडेल?

अशी आहे घटना

पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात मुलगी शिकत आहे. पंकज श्याम साळवे (वय २३, रा. कुंदेवाडी, ता. निफाड) याच्याकडे ही मुलगी दुसरीत असल्यापासून शिकवणीला जात होती. मुलीच्या खोलीत शुक्रवारी तिच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी आढळली. "सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे.'' असे त्या चिठ्ठीत नमूद केलेले होते. खात्री करण्यासाठी मुलीचे कुटुंब साळवेच्या घरी गेले, तेव्हा त्याच्या घराला कुलूप असल्याचे लक्षात आल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हंटले आहे.

बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असून, साळवे एका शाळेत हंगामी शिक्षक आहे. तो देवपूर परिसरात दोनतीन ठिकाणी शिकवण्या घेतो. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन साळवेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com