school girl kidnapping.jpg
school girl kidnapping.jpg

मद्यधुंद अवस्थेत तो 'ती'ला जबरदस्तीने त्याच्यासोबत...अन् त्याने...

Published on

नाशिक : (नाशिकरोड) सिन्नर फाटा परिसरात शाळेतून नेहमीप्रमाणे ती घरी जायला निघाली... पायी घरी जातांना अचानक तो समोर येऊन तिला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. एका जागरूक युवकाने विद्यार्थिनीची सुटका केली. दुचाकी सोडून पाळलेल्या त्या युवकाचा पोलिस शोध घेत आहेत. 

असा घडला प्रकार

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा भागातील गोदरेजवाडी भागात राहणारी 12 वर्षीय मूकबधिर विद्यार्थिनी मुक्तिधाम जवळील मतिमंद शाळेत शिकायला असून, सोमवार (ता. 10) ती सायंकाळी पाचच्या सुमारास शाळेच्या बसने सिन्नर फाटा येथे उतरली. रस्त्याने पायी जात असतांना मारुती मंदिरमागे पल्सरवर (एमएच 15 जीजी 9874) आलेल्या मद्यधुंद युवकाने विद्यार्थिनीची छेड काढत तिला दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी झालेल्या झटापटीत विद्यर्थिनीच्या हाताला मुकामार लागला. जवळच चिकन विक्री करणारा युवक इरफान शेख याच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्याने धाव घेत विद्यार्थिनीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. संशयित युवकाने दुचाकी सोडून पलायन केले. जाता - जाता इरफान याला ठार मारण्याची धमकी दिली. 

तपासाची चक्रे फिरवत युवकाला ताब्यात घेतले

संबंधित प्रकाराबद्दल माजी नगरसेवक शिवाजी भागवत, सामाजिक कार्यकर्ते अन्वर मणियार यांना माहिती मिळाली असता, त्यांनी विद्यार्थिनीला घेऊन नाशिकरोड पोलिस ठाणे गाठत वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांना घटना कथन केली. संबंधित युवकाला कडक शासन करण्याची मागणी केली. बिजली यांनी तपासाची चक्रे फिरवत युवकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com