सनदी अधिकाऱ्यांकडून मराठा समाजात गैरसमज : आमदार विनायक मेटे 

दत्ता जाधव
Wednesday, 14 October 2020

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही तांत्रिक मुद्द्य़ांवर या आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या या समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे सांगून आमदार मेटे यांनी लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या परीक्षांबाबत सातत्याने पत्रकबाजी सुरू असल्याचा आरोप केला.

नाशिक : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, हे चांगले पाऊल आहे. परंतु काही सनदी अधिकारी या परीक्षांबाबत सातत्याने पत्रकबाजी करत द्वेष पसरवत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलन शिवसंग्राम परिषदेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मंगळवारी (ता.१३) येथे केला. 

समाजासमाजातील वाढता द्वेष थांबवा
राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही तांत्रिक मुद्द्य़ांवर या आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या या समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे सांगून आमदार मेटे यांनी लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या परीक्षांबाबत सातत्याने पत्रकबाजी सुरू असल्याचा आरोप केला. या पत्रकबाजीतून हे अधिकारी फूट पाडत असल्याचे त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

येत्या १ व २२ नोव्हेंबरला होणाऱ्या परिक्षांच्यावेळीही मागच्यासारखीच परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन परीक्षांबाबतच्या घोषणांबाबत सबुरीने घ्यावे व अधिकाऱ्यांनिही खोडसाळपणा थांबवून समाजासमाजातील वाढता द्वेष थांबवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misunderstandings in Maratha community said vinayak mete nashik marathi news