"कमतरता भासल्यास नगरसेवक देतील उड्डाणपुलासाठी निधी" - आमदार मौलाना मुफ्ती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

मालेगाव शहरातील जुना पॉवर हाउस ते सखावत हॉटेल दरम्यानच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविणे गरजेचे आहे. शहरातील सर्व राजकीय पक्षांसह महापालिका प्रशासनाचेही यावर एकमत आहे. ठेकेदाराने पुलाचे वाढीव काम करण्यापूर्वी इतर शिल्लक कामे पूर्ण करावीत तोपर्यंत लांबी वाढविणे व निधीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करू. प्रसंगी निधीची कमतरता भासल्यास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक उड्डाणपुलासाठी नगरसेवक निधी देतील, असे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी येथे सांगितले. 

नाशिक / मालेगाव : मालेगाव शहरातील जुना पॉवर हाउस ते सखावत हॉटेल दरम्यानच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविणे गरजेचे आहे. शहरातील सर्व राजकीय पक्षांसह महापालिका प्रशासनाचेही यावर एकमत आहे. ठेकेदाराने पुलाचे वाढीव काम करण्यापूर्वी इतर शिल्लक कामे पूर्ण करावीत तोपर्यंत लांबी वाढविणे व निधीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करू. प्रसंगी निधीची कमतरता भासल्यास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक उड्डाणपुलासाठी नगरसेवक निधी देतील, असे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी येथे सांगितले. 

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मालेगावला एकजूट 
शहरात साकारणाऱ्या पहिल्यावहिल्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.२०) सायंकाळी पोलिस नियंत्रण कक्ष आवारात महापालिका प्रशासन, पोलिस व महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत मौलाना मुफ्ती यांनी ही माहिती दिली. प्रस्तावित उड्डाणपूल सखावत हॉटेलजवळ हजारखोलीत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्याजवळच समाप्त होणार आहे. 

अडीच कोटी रूपये खर्च अपेक्षित 
हजार खोली भागातील वस्ती, येथील व्यापार, व्यवसाय, नवीन बसस्थानक यामुळे या परिसरात सातत्याने मोठी वर्दळ असते. यासाठी पुलाची लांबी वाढविणे आवश्‍यक आहे. वाढीव ८० मीटर लांबीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महापालिकेने दिल्यास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक त्यांच्या निधीतून देतील. अतिरिक्त निधीची गरज भासल्यास आमदार निधीही देऊ, असे आमदार मौलाना मुफ्ती यांनी या वेळी स्पष्ट केले. 

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

अतिक्रमण हटल्यास काम पूर्ण 
मनपाने काही भागातील अतिक्रमण अद्यापही हटविलेले नाही. तेथील काम प्रलंबित आहे. अतिक्रमण हटविल्यास ते काम पूर्ण करू, असे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. माजी आमदार आसिफ शेख यांनीही पुलाची लांबी वाढविण्याची मागणी केलेली आहे. तर जनहितासाठी पुलाची लांबी वाढविणे गरजेचे असल्याचे नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी यांनी सांगितले. 

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

बंदोबस्त देण्याची तयारी 
अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व मुद्दे व उड्डाणपुलाची परिस्थिती जाणून घेतली. यानंतर अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविली. बैठकीस महापालिका उपायुक्त नितीन कापडणीस, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर अभियंता कैलास बच्छाव, नगरसेवक आमिन फारुख, रिजवान खान, युसूफ इलियास आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA mufti said Corporators funding for flyovers nashik malegaon marathi news